भुशी धरणावर पर्यटनासाठी गेलेले ५ जण गेले वाहून, ४ मुलं आणि एका महिलेचा समावेश

0

लोणावळा :

भुशी धरणावर पर्यटनासाठी आलेली १ महिला आणि ४ मुलं बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. धरण परिसरातील धबधब्यावर गेले असताना तोल जाणून धबधब्यात पडले आणि वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोणावळा पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

गेल्या चार पाच दिवसांपासून मुंबई परिसर आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगर कपाऱ्यांवरील धबधबे प्रवाहीत झाले आहेत. लोणावळा हे मुंबई आणि पुणे शहरातील पर्यकांसाठी आकर्षणाचं ठिकाण आहे. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांचा ओढा या ठिकाणी असतो. दरम्यान लोणावळ्यातील भुशी डॅमवर आजच ओव्हर फ्लो झालं होतं. त्यामुळे पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे.

दरम्यान आज पुण्यातील अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमवर आलं होतं. भुशी धरण परिसरात असलेल्या रेल्वे वॉटर फॉलवर पर्यटनाचा आनंद घेताना त्यांचा तोल जाऊन ते धबधब्यात पडले. एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेले होते. त्यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. महिला आणि एका मुलीचा मृतदेह सापडला आहे. इतर ३ मुलांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

See also  मराठी तरुणांनाच आपले सरकार केंद्र द्या अन्यथा आंदोलन : मराठा समाजाचा इशारा