मतमोजणीसाठी शहरात अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त

0

पुणे :

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मावळ, शिरूर, बारामती लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. तर मावळ लोकसभेची मतमोजणी शहराच्या हद्दीत लोकसभा निवडणुकीची मतमोजणी श्री शिवछत्रपती क्रीडासंकुल, बालेवाडी येथे होणार आहे. मतमोजणी होत असताना तसेच मतमोजणी झाल्यानंतर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मतमोजणीच्या ठिकाणी आणि शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे.

शहरात सहा पोलीस उपायुक्त, 10 सहायक आयुक्त, 217 पोलीस निरीक्षक/ सहायक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, 2000 अंमलदार, राखीव पोलीस दलाच्या सात तुकड्या, चार स्ट्रायकिंग फोर्सच्या तुकड्या असणार आहेत.

*बालेवाडी क्रीडा संकुल येथील बंदोबस्त*

बालेवाडी क्रीडा संकुल येथे मतमोजणीच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावला आहे. या ठिकाणी दोन पोलीस उपायुक्त, पाच सहायक पोलीस आयुक्त, 13 पोलीस निरीक्षक, 34 सहायक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, 250 पोलीस अंमलदार, दोन आरसीपी तुकड्या (दोन अधिकारी, 30 कर्मचारी प्रत्येक तुकडीत) असणार आहेत.

*आयुक्तालयाच्या हद्दीतील बंदोबस्त*

मतमोजणीच्या ठिकाणासह शहराच्या विविध भागात, संवेदनशील ठिकाणी देखील बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरात सहा पोलीस उपायुक्त, 10 सहायक पोलीस आयुक्त, 170 पोलीस निरीक्षक/ सहायक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, 1750 पोलीस अंमलदार, आरसीपी पाच तुकड्या (दोन अधिकारी, 30 कर्मचारी प्रत्येक तुकडीत) असा बंदोबस्त असेल.

*पोलीस आयुक्तांकडून पाहणी*

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सोमवारी (दि. 3) बालेवाडी क्रीडा संकुल येथील स्ट्राँग रुम परिसरात भेट दिली. उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांनी सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच मतमोजणीच्या अनुषंगाने त्यांनी सूचना देखील दिल्या. मतमोजणी केंद्राच्या बाहेरील बाजूला ठराविक ठिकाणी संबंधित पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी सोय केली असून तिथेही पोलिसांची निगराणी असणार आहे.

*इतर महत्वाच्या सूचना*

मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात तसेच आयुक्तालयामध्ये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.मतमोजणी परिसरात कोणत्याही प्रकारचे हत्यार बाळगणे तसेच प्रदर्शित करण्यास मनाई आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॉर्डलेस फोन, टॅब, लॅपटॉप, तसेच इलेक्ट्रीक घड्याळ नेण्यास मनाई आहे. मतमोजणी परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

See also  निवडणूकीसाठी पीएमपीएमएल देणार 818 बसेस, परिणामी शहर व उपनगरात पीएमपीएमएलच्या फेऱ्या होणार कमी…

मतमोजणी परिसरात ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.

निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी (दि. 4) मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आलेली आहे.