8 मे जागतिक रेडक्रॉस दिन व आंतरराष्ट्रीय थालसेमिया दिना निमित्त वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

0

पुणे :

इंडियन रेडक्रॉस सोसायटी, पुणे जिल्हा शाखा आयोजित विविध स्पर्धेत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या पारितोषिकांचे वितरण एम.जी. रोड, इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी कौन्सलर व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष डॉ. विक्रम फाटक यांनी जागतिक रेडक्रॉस दिनाच्या सर्व युवकांना शुभेच्छा देऊन विविध पारितोषिकांचे वितरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा शाखेचे मानद सचिव प्रा. आर. व्ही. कुलकर्णी यांनी करतेवेळी युवकांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक करून मानवता आपल्या हृदयात तेवत ठेवणे महत्त्वाचे असल्याचे सांगत, माणुसकी जिवंत ठेवणे तसेच मानवाने मानवा सम वागणे हीच रेडक्रॉसची शिकवण आहे असे मत व्यक्त केले केले.

शाळा स्तरावरील एन. के. महाजन चषक सुंदरबाई मराठे शाळा, विद्या कुलकर्णी चषक सेंट थॉमस पब्लिक स्कूल व महाविद्यालय स्तरावरील नासिर नानावटी चषक मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, विद्या कुलकर्णी चषक सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी यांनी मिळविले. तसेच याप्रसंगी निबंध, वक्तृत्व, गीत गायन, पथनाट्य स्पर्धेतील विविध पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

थालसेमिया पेशंट मिस ऑनरिला मित्रा व अश्विनी धायंजे यांनी आपली मनोगते व्यक्त केली तसेच नेस वाडिया कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रेड क्रॉस वरील पथनाट्य याप्रसंगी सादर केले.

सूत्रसंचालन उषा साळवे व आभार ज्युनियर व युथ रेडक्रॉसचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी व्यक्त केले.

See also  रांजणगाव इथे उभेराहणार इलेक्ट्रॉनिक्स मेन्युफॅक्चरिंग क्लस्टर’, कैंद्राकडून 62.39 कोटींचा निधीराज्य सकारकडे वर्ग