केवळ मंदिरे उघडण्यास परवानगी; यात्रा, जत्रा ,उत्सव, उरुसास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार……

0

सातारा : प्रतिनिधी :-

सध्या केवळ मंदिरे उघडण्यास परवानगी आहे. यात्रा, जत्रांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नाही. त्याप्रमाणे म्हसवड येथील सिद्धनाथ व देवी जोगेश्‍वरी देवस्थानचा रथोत्सवासही परवानगी देण्यात येणार नाही. यापुढील काळात होणाऱ्या जिल्ह्यातील यात्रा व उत्सवांना प्रशासनाची परवानगी मिळणार नसल्याचं आता समोर आलं आहे.

 

प्रशासनाने श्रावण महिना ,गणेशोत्सव, नवरात्र व जिल्ह्यातील ग्रामदैवतांच्या वार्षिक यात्रा व उत्सवांना बंदी घातली आहे. वेळोवेळी जिल्हाधिकारी, तसेच संबंधित तालुक्‍यांतील प्रांताधिकाऱ्यांनी लेखी अध्यादेश काढून गावोगावच्या यापूर्वीच्या यात्रा रद्द केल्या आहेत. सातारा जिल्ह्यात होणाऱ्या यात्रात लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते.

म्हसवड येथील देवस्थानसह भाविक व व्यवसायिकांमध्ये यात्रेस परवानगी मिळण्याची खात्री आहे.यात्रेस परवानगी मिळण्यापूर्वीच यात्रा मैदानात व्यावसायिकही आले आहेत. म्हसवड पुरातन श्री सिद्धनाथ-देवी जोगेश्वरी विवाह सोहळ्याची सांगता मंगळवारी होणार आहे. यापूर्वीच्या कोणत्याही जाहीर कार्यक्रमांना प्रशासनाने मागील महिन्यात परवानगी दिलेली नाही. यात्रेस प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते.

ही रथ मिरवणूक यात्रा फक्त आठ दिवसांवर आहे. यापूर्वी जिल्ह्यातील ग्रामदैवतांच्या वार्षिक यात्रांवर बंदी घालण्याबाबत वेळोवेळी जिल्हाधिकारी, तसेच संबंधित तालुक्‍यांतील प्रांताधिकाऱ्यांनी लेखी अध्यादेश काढून गावोगावच्या यापूर्वीच्या यात्रा रद्द केल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या साथीचे रुग्ण म्हसवडसह परिसरातील गावातही रोजच आढळून येत आहेत.

See also  सातारा जिल्हा सहकारी बँकेला ईडीची नोटीस !