पुणे गणेशोत्सव 2023 : पुण्यात गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मानाचे गणपती झाले विराजमान

0

पुणे :

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचे , जल्लोषाचे वातावरण आहे. कारण सगळ्यांचाच लाडक्या गणपती बाप्पाचं वाजतगाजत आगमन झाले आहे. ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत आज मंगळवार म्हणजेच बाप्पाच्या दिनी घरोघरी आणि प्रत्येक शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होतील. पुण्यातील मनाचा पहिला गणपती असणारा श्री कसबा गणपतीची सकाळी 8.30 वा. ढोल ताशांच्या मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मानाचा पहिला गणपती पारंपारिक पद्धतीने विराजमान झाला आहे.

यानंतर मानाच्या दुसऱ्या गणपतीची म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणपतीची सकाळी 10 वाजता मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक केळकर रस्त्यावरवरून सुरू झाली. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी देवीच्या दर्शनानंतर दुपारी 12:30 वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा झाली.

मानाचा तिसरा म्हणजेच गुरुजी तालीम गणपतीची 1 वाजून 45 मिनिटांनी प्रतिष्ठापना झाली. यंदा मंडळाचे 137 वे वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर बालाजी मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे.

पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती . या बाप्पांची मिरवणूक सकाळी 10 वाजता राम मंदिर येथून पालखीमधून निघाली. सकाळी 11.30 वाजता प्रतिष्ठापना झाली असून यंदा मंडळाने उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे या वर्षी भाविक बाप्पाला सोन्याचे दात आणि जानवे अर्पण करणार आहेत.

मानाचा पाचवा गणपती केसरीवाडयातील. टिळक पंचांग नुसार 20 ऑगस्ट 2023 रोजी केसरीवाडा येथे ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे आगमन झाले असून आज गणपतीची सर्वत्र प्रतिष्ठापना झाली आहे.

पुण्यातील मानाच्या गणपतींचे आगमन झाले असून घरोघरी सर्वत्र बाप्पा विराजमान झाला आहे. यंदा भरभरून पाऊस पडू दे आणि दुष्काळ रूपी घोंगावत असलेले संकट जाऊदे अशी प्रार्थना सर्वत्र भाविक करत आहेत.

See also  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील प्रस्तावित बहु-स्तरीय उड्डाणपुलाच्या बांधकामाला दिवाळी नंतर सुरू होणार : अजित पवार