सचिन दळवी यांच्या वतीने पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब रुग्णांना संजीवनी देण्याकरिता आर्थिक मदत…

0

बाणेर :

पुण्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष सचिन दळवी यांच्या वतीने गरजु रुग्णांना संजीवनी देण्याकरिता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आव्हान केल्याप्रमाणे आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.

याबद्दल माहिती देताना सचिन दळवी यांनी सांगितले की, पुण्याचे पालकमंत्री आमचे मार्गदर्शक नामदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस समाजाला समर्पित असतो, यावर्षी देखील त्यांनी आपल्या वाढदिवशी कोणतीही भेटवस्तू न आणता, कोणतीही जाहिरातबाजी न करता त्याची रक्कम गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी संजीवनी देण्याकरिता आर्थिक मदत करावी असे आव्हान केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून दादांच्या वाढदिवशी गोर गरीब रुग्णांना संजीवनी देण्याकरिता आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त केला. समजाप्रती दादा राबवत असणारे उपक्रम नेहमी आदर्शवत असतात. अशा लोकप्रिय नेत्याला आगळ्या वेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजप पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.

See also  पाषाण टेकडीवरील जोडप्याला मारहाण करुन लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना चतुःश्रृंगी पोलीसांनी केले जेरबंद