हिराजनगर स्वामी सेवा केंद्र पिरंगुट च्या वतीने करण्यात आला 10 वी आणि 12 वी च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार..

0

पिरंगुट :

हिराजनगर स्वामी सेवा केंद्र पिरंगुट च्या वतीने 10 वी आणि 12 वी च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

मुळशी तालुक्यातुन पहिली आलेली विद्यार्थीनी कु, प्राची प्रदीप पाटील हि पिरंगुट इंग्लिश स्कूल पिरंगुट ची विद्यार्थी असून तिला शालेय कालावधीत अभ्यासाबरोबर वक्तृत्व स्पर्धा, वाचन, संगणक, संगीत हे छंद जोपासत प्राचीने 95:40% मिळवत तालुक्यातुन पहिली आली.

सुदर्शन विद्या मंदिर ह्या शाळेतील विद्यार्थीनी कु. प्रज्ञा योगेश पवळे हिने 93.40% मिळवत शाळेतून पहिली आली तर पूनम राजेंद्र शेंडगे 91%, श्रावणी तुकाराम माळी 86%, अक्षदा चव्हाण 61%, रोहित घारे 83%, गुण मिळवून यश संपादन केले.

पेरीविकल इंग्लिश मीडियम स्कूल चे विद्यार्थी प्रज्ञा हंडराळे हिला 92 टक्के मिळून शाळेतून पहिली आली, श्रेया कराडे 85 टक्के, श्रवणी तराल 88 टक्के, पार्थ पंडित 88टक्के, यांनी गुण मिळवत यश संपादन केले.

संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल चे विद्यार्थी प्रज्वल दाभाडे 91% मिळवत पहिला आला प्रणव शिंदे 89%, प्रथमेश कदम 80%, विद्या भवन इंग्लिश मीडियम चे विद्यार्थी आदिती भोसले हिला 91.20% मिळवत शाळेतून पहिली आली वैष्णवी सांडभोर 88.40%, मानव मुलुक 83.40%, शिवानी ढोरे 73.40% तसेच एम आय टी स्कूल चा विद्यार्थी हितेश आहिरे ह्यास 80% मिळाले

ह्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वामी सेवा केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, पिरंगुट गाव चे मा. उपसरपंच राहुल पवळे, संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल चे प्रिन्सिपल साठे मॅडम व त्यांचा स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमाचे आयोजन हिराजनगर स्वामी सेवा केंद्राचे प्रमुख, सर्व प्रतिनिधी यांनी केले होते.

See also  बावधन येथे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 'स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्ताने' रॅली ला मोठा प्रतिसाद..