स्वतःची कौशल्ये वाढवा,त्यानुसार व्यवसाय निवडा , प्रोग्रेसिव्ह रहा आणि यशस्वी होऊन ‘माॅडर्न ‘बना – डाॅ पराग काळकर

0

वारजे :

प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,वारजे,पुणे-58*  येथे  वार्षिक बक्षिस वितरण समारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चेअधिष्ठाता प्रा. डॉ. पराग काळकर, प्रोग्रसिव्ह एज्यूकेशन सोसायटीचे सचिव प्रा. शामकांत देशमुख, मॉडर्न लॉ कॉलेजच्या प्राचार्या प्रा. डॉ. अनन्या बिबवे व मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स वारजे पुणे यांचे व्हिजीटर प्रा. पल्लवी जाधव, श्री दीपक मराठे व वारजे शैक्षणिक संकुलाच्या सर्व मुख्याध्यापिका उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली व नंतर प्राचार्या डॉ वर्षा बापट यांनी वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर संस्थेचे सचिव  प्रा. शामकांत देशमुख यांची मुलांना स्वतःची बलस्थाने, कमी,असणाऱ्या संधी व धोके कसे ऒळखायचे या  बद्दल मार्गदर्शन केले व त्यानी स्वतः  बद्दल जाणून घेण्यास सांगितले. यानंतर प्रा. डॉ पराग काळकर यांनी मुलांना गुंतवणूक आराखडा, व्यवसाय आराखडा कसा आखावा व व्यवसायाचे नियोजन आणि अभ्यासक्रमाचा व्यवहारिक उपयोग कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. स्वतःची कौशल्ये वाढवा,त्यानुसार व्यवसाय निवडा आणि यशस्वी होऊन ‘माॅडर्न ‘बना असे सांगितले.

सर्वोकृष्ट विद्यार्थी हा पुरस्कार TY B.com ची अंकिता ढेणे हिने पटकावला.

सरस्वती वंदना दिपाली म्हैसकर यांनी गायली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया सामक आणि प्रा. ॲड. वैशाली कुलकर्णी केले, आभार प्रदर्शन प्रा. शौनक  माईणकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय  प्रा. ॲड. वैशाली कुलकर्णी,प्रा. प्रिया सामक, प्रा. शौनक माईणकर यांनी केले. हे सर्व उपक्रम प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मा.डाॅ. गजानन एकबोटे, सचिव  प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह डाॅ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह डाॅ. निवेदिता एकबोटे, व्हीजिटर प्रा.पल्लवी जाधव आणि प्राचार्या डाॅ. वर्षा बापट यांच्या मार्गर्शनाखाली झाले.

See also  चांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार, सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख