हिंजवडी पोलीसांची कारवाई १६ लाख रु. किमतीचा विमल गुटखा टेम्पोसह आरोपीस केले जेरबंद..

0

हिंजवडी :

पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड मधील पोलीस स्टेशन हद्दीत चालणारे अवैध धंदे विरुद्ध कारवाई करून अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे मा.पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड आदेश असल्याने हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत होणाऱ्या अवैध्य धंद्यावर हिंजवडी पोलीस बारीक लक्ष ठेवत असताना १६ लाख रु. किमतीचा विमल गुटखा टेम्पोसह आरोपीस जेरबंद करुन मोठी कारवाई केली आहे.

पोहेकों/११७१ सराटे व पोना/ ११५७ हांगे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, एक इसम चांदणी चौक भुगाव रोड मार्गे पहाटे गुटख्याने भरलेला एक टेम्पो घेऊन जाणार आहे. अशी माहीती मिळालेने सदरची माहीती अवैध धंदे विरुध्द पथकाचे प्रमुख सपोनि अजितकुमार खटाळ यांना दिली.

तात्काळ त्यांनी स्टाफ सोबत घेउन ट्रॅप लावला दिनांक २५/३/२०२३ रोजी पहाटे ५:०० वाजता चांदणी चौक भुगाव रोडवर ट्रॅप लावुन बसले असता सकाळी ६:३० वा चे सुमारास एक पांढ-या रंगाचा छोटा हत्ती टेम्पो हा गुटख्याने भरुन असलेला आला त्यास थांबण्याचा इशारा केला असता सदर गाडी चालकाने गाडी न थांबवता तसेच पोलीसांचे इशा-याकडे लक्ष न देता गाडी जोरात घेवुन पळुन जावु लागल्याने त्यास सपोनि खटाळ यांनी व पोलीस स्टाफने पाठलाग करुन त्यास हॉटेल पी.नाईन, भुगावरोड, पुणे या ठिकाणी गाडीसह ताब्यात घेवुन पहाणी केली असता त्यामध्ये १६,००,०००/-रुपयाचा विषारी विमल गुटख्याच्या माल मिळुन आला.

भा.द.वि. कलम सदर इसमास टेम्पोसह ताब्यात घेऊन त्यांचे विरुध्द ३२८,२६९.२७०,२७२.२७३.३४ सह मो.वा.का.कलम १८४,११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली असुन सदर आरोपीचे नाव १) रामलाल चौगाजी चौधरी, वय-४५ वर्षे, रा-शॉप नंबर १ मनपसंद किराणा दुकान, तळजमला बाबुराव निवास बिल्डींग, पुणे.

सदरची कारवाई मा.विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा.मनोजकुमार लोहीया सह.पोलीस आयुक्त सो.मा.डॉ संजय शिंदे सो, अप्पर पोलीस आयुक्त सो.मा.काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त परि. २, मा. श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग वाकड, यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक, सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक, अवैध धंदे विरोधी पथकाचे प्रमुख सपोनि अजितकुमार खटाळ, सहा. पोलीस उपनिरीक्षक महेश वायवसे, सराटे पोहेकों/१०४१ संतोष डामसे, पोहेकों/११७१पोहेकों/ ११४८ सोमवंशी, पोना/११५७ हांगे पोलीस अमंलदार /२६५९ रवी पवार, तपास पथक स्टाफ यांनी केली आहे.

See also  पावसाळ्यात विद्युत अपघात होऊ नये म्हणून नागरिकांनी खबरदारी घ्यावी : महावितरण