कृष्णगंगा सोशल फाउंडेशन च्या तृतीय वर्धापन दिनानिमीत्त २०४ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

0

पाषाण :

कृष्णगंगा सोशल फाउंडेशन च्या तृतीय वर्धापन दिनानिमीत्त आयोजीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे शहराचे माजी महापौर व सरचिटणीस भाजपा महाराष्ट्र राज्य मा. मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. परिसरातील महीला नागरीक आणि युवकांनी मोठया उत्साहात रक्तदान केले. या वेळी २०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सोमेश्वरवाडीतील पोपटराव जाधव यांची सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल, ह.भ.प. श्री. दिलीप तुकाराम रणपिसे यांची दी गवर्नमेंट सर्वेटं्स महाराष्ट्र को – ऑप क्रेडिट सोसायटी ली पुणे संचालक पदी निवड झाल्याबद्दल आणि ह.भ.प नितिनभाऊ निम्हण यांना वाढदिवसानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

*पहा काय म्हणाले पालकमंत्री चंद्रकांत पाटील कृष्णगंगा सोशल फाउंडेशन वर्धापन दिनी*

या वेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, रोहन कोकाटे यांनी कृष्णगंगा सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमातून समाजाची सेवा करण्याचे काम केले आहे. नेहमीच होणाऱ्या विविध अपघातांनमुळे रक्तदानाची गरज सतत भासत असते ही गरज लक्षात घेत सलग तिसऱ्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून महत्त्वाचे काम रोहन करत आहे. असेच उपयोगी कामे करत रहावे यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत.

या प्रसंगी ह.भ.प.मारुती कोकाटे, राहुल कोकाटे, लहु बालवडकर, शिवम सुतार, सचिन दळवी, राजेंद्र सुतार, नवनाथ ववले, मधुकर रणपिसे, जगगनाथ जाधव, तारामन जाधव तसेच कोकाटे तालिम मंडळ व कृष्णगंगा सोशल फाउंडेशन चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  पाषाण येथे 'वननेस वन' परियोजनेअंतर्गत ६४५ वृक्षांची लागवड