बालेवाडी :
बालेवाडी येथील बाबुराव (शेठजी) गेणजी बालवडकर प्राथमिक विद्यामंदिर मनपा शाळा क्र. १५२ व १२१ मध्ये अनेक गैरसोयी असुन विद्यार्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याची तक्रार वारंवार करून देखिल पुणे महानगर पालिका व संबधित शिक्षण विभाग याची दखल घेत नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाशतात्या किसन बालवडकर हे शाळेतील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे.
या बद्दल बोलतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाशतात्या किसन बालवडकर म्हणाले की, पुणे मनपा येऊन २५वर्षे पूर्ण झाली, पण बालेवाडीतील शाळेचा विद्यार्थाचा, शिक्षकाचा वनवास मात्र संपत नाही, अनेक मोठ्या संस्थांना बालेवाडीतील गावठाणातील जागा मिळाल्या. संस्था, कॉलेज एन आय अकॅडमी, क्रिडा गाऊंड तयार झालीत. पण बालेवाडीतल्या शाळेला मात्र हक्काच्या जागेसाठी आज ही प्रतिक्षा करावी लागत आहे हे दुर्भाग्य आहे.
शाळेत १५०० + विद्यार्थी, ५० शिक्षक, १७ खोल्या, एका वर्गात सरासरी ६०+ विद्यार्थी, ग्राऊड + २ मजले इमारत अशी सत्य परिस्थिती शाळेची असून विद्यार्थांना साफसफाई करावी लागत आहे तसेच अपुऱ्या सुविधांना सामोरे जावे लागत आहे. हि अतिशय गंभीर बाब आहे. वारंवार मागणी करूनही अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणूनच खालील मागण्या करिता एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे असे प्रकाश बालवडकर यांनी सांगितले.
मागण्या:
1.दिड हजार विद्यार्थाच्या मागे एकच शिपाई
2.बाथरूम मध्ये पुरेसे पाणी नाही, टँकरचे पाणी घ्यावे लागते.
3.खेळासाठी ग्रांड नाही.
पर्याय समोरील करण सिलेस्टाची ओपन जागा ती उपलब्ध आहे. ती मिळवून द्यावी.
4.नविन इमारत बांधून देण्याचे नियोजन करावे.
5.नविन मुख्यध्यापकाची नेमणूक करावी.
6.बालवाडी वर्गासाठी नविन जागा व शिक्षिका यांची नेमणूक करावी.
7.शाळेसमोर गती रोधक आवश्यक आहे.
या मागण्यांची दखल घेत त्या सोडविल्या नाही तर गुरुवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असून तरी देखिल प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी माहिती देताना शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश किसन बालवडकर यांनी यावेळी दिला आहे.