येणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखिल महाविकास आघाडी एकत्र लढेल : अजित पवार

0

पुणे :

अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा संदर्भ देऊन पदवीधर व शिक्षक मतदार संघामध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाचा दाखला देत राज्याचे वारे बदलले असल्याचे म्हटले. म्हणूनच जाणीवपूर्वक पुणे जिल्ह्यातील या दोन्ही पोटनिवडणुका सहानुभूतीच्या नावाखाली बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. महाविकास आघाडी, मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा गनिमा कावा ओळखून एकत्र येत आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या तिकिटाचं कसं होईल ? याची कुठल्याही प्रकारची चिंता न करता एक दिलाने कसबा हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी जोर लावावा. आपला विजय निश्चित आहे. मागील निवडणुकीचा संदर्भ देऊन मागे काय झाले हे न पाहता ही नवी पहाट आहे, नवीन सुरुवात आहे असे समजून कामाला लागा. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाचा निकालाने येथे काहीही घडू शकते. पुन्हा परिवर्तन होऊ शकते याची कार्यकर्त्यांनी आठवण ठेवावी असे अजितदादांनी म्हटले.

पुढे पवार म्हणाले की नवीन राज्यपालांचं मी स्वागत करतोय,’ही निवडणूक महागाई आणि बेरोजगारी या दोन प्रमुख मुद्द्यांवर लढली जावी. कसबा हा पुण्यातला सर्वात लहान मतदारसंघ आहे. म्हणूनच काँग्रेसने विचारपूर्वक रवी धंगेकरांना उमेदवारी दिली आहे. रवी मनसेमध्ये असतानाही चांगला लढला होता. पण गेली 5 टर्म मतविभाजनामुळे इकडे भाजपचा उमेदवार निवडून येत आहे. म्हणूनच यावेळी आपण सर्व महाविकासआघाडीच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. असं वक्तव्य अजित पवारांनी केलं.

महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठक महापालिकेतही महाविकास आघाडी एकत्रच : महापालिकेतही महाविकासआघाडी महापालिका निवडणुकांच्या जागावाटपाची चिंता करू नका, महापालिकेतही महाविकासआघाडी एकत्रच लढेल, असा विश्वास अजित पवारांनी महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांना दिला. तसंच प्रचार करताना जपून बोला, कुणीही नाराज होणार नाही याची काळजी घ्या. 26 तारखेला पंजालाच मतदान करा, एक नंबरला धंगेकरांचं नाव आहे, त्यांना मत द्या, असे आवाहन अजित पवारांनी केलं.

काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या भाषणात, स्वातंत्र्यसंग्राम काळात इंग्रजांची सत्ता उलथून लावण्यासाठी याच कसब्यातून क्रांतिकारक, महापुरुषांची बीजे रोवली गेली. याचप्रमाणे भाजपाची हकालपट्टी करण्याची वेळ आली आहे असे पटोले म्हटले. देशातील व राज्यातील परिस्थितीचा संदर्भ देत पटोले यांनी, घमेंडी केंद्र सरकारने देशातील तरुणाईंला बेरोजगारीला, व्यापाऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. या प्रवृत्तींना मूळासहीत उखडून काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची पायाभरणी असेल व ती देशासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असे नमूद केले.

See also  मास्क न घालता फिरणार्‍या वर कडक कारवाई : अमिताभ गुप्ता

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रिंगणात उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ येथील नातूबाग मैदानात विरोधी पक्षनेते अजित पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह आमदार संग्राम थोपटे, चेतन तुपे, सुनील टिंगरे,माजी राज्यमंत्री रमेश बागवे,माजी आमदार उल्हास दादा पवार, मोहन जोशी. दीप्ती चौधरी, जयदेव गायकवाड, उल्हास काळोखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे,आदी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.