बस स्टॉप चे शेड पीएमपीएलने अचानकपणे हटवले, नागरीकांना नाहक त्रास…

0

बावधन :

गुजरात कॉर्नर जवळील बस स्टॉप चे शेड पीएमपीएलने अचानकपणे हटवले आहे सदर शेड हटवल्याने अनेक नागरिकांना बसची वाट पाहत रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. नागरिक रस्त्यावर उभे राहिल्याने वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे आणि नागरिकांची ही गैरसोय होत आहे.

याबद्दल माहिती देताना आदमी पक्षाच्या अमोल काळे यांनी सांगितले की, ज्यावेळेस हे बस शेड का हटवले याची चौकशी ऑनलाइन तक्रारीच्या माध्यमातून केली त्यावेळेस ऑनलाईन तक्रारीला उत्तर देताना पी एम पी एल ने सांगितले की, ज्या वेळेस बस स्टॉप चे शेड उपलब्ध होईल त्यावेळेस तिथे ते परत लावले जाईल.

अशा प्रकारे असणारे शेड काढून नागरिकांना त्रास देऊन ज्या वेळेस परत शेड उपलब्ध होईल त्यावेळेस ते तिथे लावले जाईल या सर्व गोष्टींमध्ये नागरिकांचे हित काय? असा प्रश्न आम आदमी पक्षाकडून आता विचारला जात आहे. खरे पाहता कोथरूड बस डेपो पासून येणाऱ्या सर्व बस ह्या स्टॉप वर थांबतात आणि अनेक नागरिक ह्या बस थांब्यावरून बस मध्ये बसून पुढचा प्रवास करतात, बस थांबा हटविल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

म्हणून आम आदमी पक्षातर्फे अशी मागणी केली आहे की, सदर ठिकाणी लवकरात लवकर बस थांबा परत उभारावा आणि नागरिकांची समस्या सोडवली जावी.

See also  सुसगाव, पाषाण परिसरामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी...