सुतारवाडी येथे गणतंत्रदिनानिमित्त शिवआरोग्य सेनेमार्फत झेंडावंदन आणि आरोग्य शिबिर संपन्न…

0

सुतारवाडी :

26 जानेवारी 2023 रोजी गणतंत्रदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवआरोग्य सेना महेश भिमराव सुतार पुणे शहर समन्वयक व लोपमुद्रा हॉस्पिटल सुसरोड सुतारवाडी पाषाण सन शाईन प्रिस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ.श्री.किशोर ठाणेकर आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेन्द्र दगडू(दादा) सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झेंडावंदन व आरोग्य शिबीर घेण्यात आले.

या कार्यक्रमाची माहिती देताना शिवआरोग्य सेना पुणे शहर समन्वयक महेश सुतार यांनी सांगितले की, सुतारवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची तपासणी या शिबिरामध्ये करण्यात आली. नागरीकांना या आरोग्य शिबिराचा उपयोग होऊन येणाऱ्या पुढील काळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. असेच विविध उपक्रम शिवआरोग्य सेने मार्फत घेतले जातील

यावेळी शिव आरोग्य सेना पुणे जिल्हा समन्वयक रमेशभाऊ क्षीरसागर, पुणे जिल्हा सचिव कुणाल दादा कांदे, वंचित बहुजन आघाडी कोथरूड विधानसभा करण कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पारपाडण्यात आला. यावेळी शिवसेना महिला आघाडी सुनीता रानवडे, सुरेखा शेळके, शालन पाडाळे, तसेच सुतारवाडीतील नागरिक भिमराव सुतार, दगडू जाधव, शंकर सुतार, गणेश मोरे, अमोल फाले,सोमनाथ जाधव, दिनेश सुतार, दिलीप सोनवणे, सुतारवाडीतील महिला वर्ग शांताताई सुतार,सोनलताई सुतार, कावेरी सुतार, अश्विनी बलकवडे, कालिका गव्हाणे, पल्लवी शिंदे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

See also  पाषाण येथे संत नरहरीमहाराज सोनार यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन