ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या धनुष्यबाणाच्या दाव्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने 17 जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलली..

0

नवी दिल्ली :

महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या धनुष्यबाणाच्या दाव्यावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी पार पडली.

यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, युक्तिवादानंतरही आयोगाकडून निर्णय राखून ठेवण्यात आला. तसेच आयोगाच्यावतीने 17 जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

केंद्रीय निवडणूक आयोगापुढे उद्धव ठाकरे गटाकडून सुमारे पंचवीस लाख प्रतिज्ञापत्रे तर शिंदे गटाकडून जवळपास साडेचार लाख प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात आली होती. यावर आज सुनावणी घेण्यात आली. ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल यांनी तर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.

यावेळी एकनाथ शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी शिंदे यांची निवड जुलै 2022 ही राष्ट्रीय कार्यकारणीने केली आहे, त्यामुळे ही निवड योग्य असल्याचा दावा केला. तसेच सादिक अली प्रकरणाचा दाखला देत शिवसेना पक्षावर आमचा दावा असल्याचे शिंदे गटाचे वकील अॅड. मनिंदर सिंह यांनी केला. तर, सुप्रीम कोर्टाचा सत्ता संघर्ष प्रकरणी निकाल येईपर्यंत आयोगाने कोणतीही सुनावणी घेऊ नये, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे वकील अॅड. कपिल सिब्बल यांनी केली.

दरम्यान, दोन्ही गटाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय राखून ठेवला. तसेच 17 तारखेला याबाबत पुन्हा सुनावणी घेण्याबाबत सांगितले.

See also  नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर