महाराष्ट्र केसरी किताब साठी पुणे शहर व पुणे जिल्ह्याच्या संघाची निवड चाचणी स्पर्धेचे उदघाटन संपन्न..

0

वारजे माळवाडी :

‘महाराष्ट्रातील कुस्तीत अधिक प्रगती होत असून ती चांगली झेप असून ती आता हरियाणावर मात करून पुढे जाईल.’ असे प्रतिपादन राज्याच्या कुस्तीच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष संजय कुमार सिंग यांनी वारजे येथे बोलताना व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने होणाऱ्या ६५ व्या वरिष्ठ गट व माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब २०२२ या कुस्ती स्पर्धेसाठी पुणे शहर व पुणे जिल्ह्याच्या संघाची निवड चाचणी स्पर्धेचे उदघाटन शनिवारी वारजे कुस्ती संकुल येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.

संजय कुमार सिंग यांच्या हस्ते श्रीहनुमान प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर ९२ किलो वजन गटातील स्पर्धा लावण्यात आली. यावेळी महापालिकेच्या माध्यमातून माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी उभारलेल्या वारजे कुस्ती संकुलाचे सिंग यांनी कौतुक केले.

माती व गादी विभाग गटात : ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७, व ८६ ते १२५ किलो गटात (महाराष्ट्र केसरी) स्पर्धा झाल्या. शहरातून १०० खेळाडू व जिल्ह्यातून १०० खेळाडू सहभागी झाले आहेत. शहर व जिल्ह्यातून प्रत्येकी २०- २० खेळाडू महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवडणार आहे. अशी माहिती कुस्तीगीर संघ पुणे शहर अध्यक्ष हिंदकेसरी अमोल बराटे, पुणे जिल्हा अध्यक्ष हिंदकेसरी अमोल बुचडे यांनी दिली.

यावेळी, कुस्ती महर्षी बाळासाहेब लांडगे, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, गुलसे तालीमचे विजय जाधव, वस्ताद विजय बराटे, वस्ताद विकास रानवडे, माजी उपमहापौर दिलीप बराटे, श्रीकृष्ण बराटे, तात्या कदम, श्रीरंग चव्हाण, माजी नगरसेवक सायली वांजळे, बाबा धुमाळ, किरण बारटक्के, विकास दांगट, प्रा.विलास पवार, दिनकर वांजळे, सचिन दांगट, अतुल दांगट, विजय गायकवाड, उपस्थित होते.

दशरथ पवार, दत्ता भिलारे, गौनेर काळेकर, राजकुमार शिंदे, अमर बराटे, भारतभूषण बराटे यासह अनेकांचा आयोजनात सहभाग होता.

See also  महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती