पुणे :
अभिजीतदादा कदम मित्र मंडळ व प्रतिष्ठान संचलित अभिजीतदादा कदम कबड्डी संघाचा १७ वा व डॉ पतंगराव कदम महिला कबड्डी संघाचा चौथा वर्धापनदिनानिमित्ताने क्रीडा भूषण पुरस्कार राष्ट्रीय कायाकिंग व कैनोइंग खेळाडू अक्षय कांबळे व पॅरा राष्ट्रीय जलतरण पट्टू चैतन्य कुलकर्णी यांना देण्यात आला. तसेच स्व. फिदाभाई कुरेशी क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार आंतरराष्ट्रीय पंच दत्ता झिंजुर्डे व आदर्श शिक्षक पुरस्कार अभिनव विकास फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. गौरी विकास बोरकर यांना नगरसेवक अँड. रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम व अर्जून पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांच्या हस्ते देण्यात आला.
जिल्हा,राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार बबनराव काशिद (उप महाराष्ट्र केसरी), दत्ताञय तळवले (अध्यक्ष तंटामुक्त समिती औरंगपुर), पै. नवनाथ धनवाडे (युवा उद्योजक), सौ. नयनाताई सोनार (सामजिक कार्यकर्ता), आकाश कनोजिया (इंडियन आर्मी), अमरसिंग चव्हाण (माजी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू) या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
स्व फिदाभाई कुरेशी क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच दत्ता झिंजुर्डे यांनी पुरस्काराला उत्तर देताना म्हणाले आयुष्यात पहिल्यांदाच मला पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराने कबड्डी क्षेत्रात अधिकाधिक काम करण्याची प्रेरणा मिळत राहील.
क्रीडा भूषण पुरस्कार विजेते चैतन्य कुलकर्णी म्हणाले अपघातामुळे अपंगत्व आले पण घरच्यांच्या पाठिंब्यामुळे व जिद्दीच्या जोरावर पॅरा राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले व महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाईचे शिखर सर केले.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अँड रामचंद्र कदम म्हणाले आमचे प्रतिष्ठान विविध खेळातील खेळाडू घडवण्याचे व प्रेरणा देण्याचे काम आगदी नेटाने करत आहेत.
अध्यक्ष मनोगतात अर्जून पुरस्कार शांताराम जाधव म्हणाले खेळाडूंनी पैशासाठी खेळ खेळू नये खेळासाठी खेळ खेळावा.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सागर खळदकर यांनी केले. सुञसंचालन अँड. शिवाजीराव भोईटे तर आभार प्रदर्शन अँड. गणेश मारणे यांनी केले.