मोदीजींच्या कार्याची उंची प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या साधकांनी उत्तम ओळखली : ना. चंद्रकांत पाटील

0

बाणेर :

माननीय मोदीजींच्या कार्याची उंची प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या साधकांनी उत्तम प्रकारे ओळखली, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. तसेच मोदीजींनी देशाची एकात्मता टिकवण्यासाठी अतिशय मोठं कार्य केलं, असेही प्रतिपादन पाटील यांनी यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बाणेर, पुणे यांच्या वतीने 60 फूट उंच व 44 फूट रुंद सर्वात मोठे ग्रीटिंग कार्ड उभारुन अतिशय अभिनव पद्धतीने शुभेच्छा दिल्या. या ग्रिटींग कार्डचे उद्घाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारीचे बी.के.डॉ त्रिवेणी, बी.के.डॉ गंगाधर भाई, डॉ.दीपक हरके, विकास गुजर,भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, भाजपचे पुनित जोशी, लहू बालवडकर, सचिन दळवी आदी मान्यवर देखील उपस्थित होते.

See also  लहू बालवडकर यांच्या संकल्पनेतून बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे व सुस या भागात पर्यावरणपूरक 'मृण्मय शुद्धी' गणेश उपक्रम सुरू.