लहू बालवडकर यांच्या संकल्पनेतून बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे व सुस या भागात पर्यावरणपूरक ‘मृण्मय शुद्धी’ गणेश उपक्रम सुरू.

0

बालेवाडी :

लहु बालवडकर आणि पर्यावरण संरक्षण गतिविधि, विद्यापीठ भाग यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे व सुस या परिसरात पर्यावरणपूरक मृण्मय शुद्धी गणेश उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे!
यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण पूरकतेला प्राधान्य देऊन पर्यावरण पूरक  उत्कृष्ट गणेश मूर्ती, सजावट आणि बाप्पाचे सोसायटी मध्येच विसर्जन करून “पर्यावरणपुरक गणेशोत्सव” साजरा करणाऱ्या सोसायट्यांना विविध बक्षीसे देण्यात येणार आहेत!

मृण्मय शुद्धी गणेश म्हणजेच पर्यावरणपूरक पारंपरिक परंपरा!

याची माहिती देताना लहू बालवडकर यांनी सांगितले की, पर्यावरणपूरक श्री गणेशा साकारण्यासाठी आमच्याकडून एक किट दिले जाईल, ज्यामध्ये गणेशमूर्तीच्या साच्यापासून ते शेणामातीच्या बनवलेल्या वस्तू असतील. यातून तुम्ही स्वतः साकारलेली पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची पूजेसाठी आकर्षक सजावटीसह स्थापना करावी. जे पर्यावरण प्रेमी गणेश मूर्ती भोवती उत्कृष्ट सजावट करतील व विसर्जनापर्यंत पर्यावरणपूरक गोष्टींची पूर्तता करतील अश्या पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू बक्षिस स्वरूपात दिली जाईल. आपल्या सर्वांचा एकच संकल्प आहे, तो म्हणजे की पर्यावरणाला पूरक ठरेल अशा गणेशोत्सवाकडे वाटचाल करावी. पुढे त्यांनीनागरीकांना आव्हान केले की, चला, निर्धार करूया येणाऱ्या उत्सवाचा पर्यावरणपूरक श्री गणेशाचा…गणपती बाप्पा मोरया!!

लहू बालवडकर यांच्या माध्यमातून बाणेर बालेवाडी येथील बहुतांशी सोसायट्यांमध्ये गणेश मूर्ती साठी आवश्यक किट वाटप करण्यात आले. नागरिकांनी आपुलकीने त्याचा स्वीकार केला.

स्पर्धेची नियमावली.

१. गणपतीची मूर्ती रंगवायला चुकूनही केमिकल किव्हा ऑईल चे आर्टिफिशियल कलर वापरू नयेत. केवळ नैसर्गिक कलर्स वापरावे , जसे हर्बल, इत्यादी.
२. गणपती भोवतीची सजावट केवळ पर्यावरण पूरक वस्तूंनी च करावी. प्लास्टिक व thermocol, तस्संम पर्यावरण विरुद्ध गोष्टी वापरू नयेत.
३. मूर्तीचे विसर्जन केवळ सोसायटी अवरात बादली, पिंप यात करावी.
४. मूर्तीच्या मातीत आम्ही देशी वृक्षांचे बीज देणार आहोत. विसर्जनानंतर ती माती कुंडीत लाऊन त्याचे रोपटे तयार करावे. आम्ही ते रोपटे गोळा करून पर्यावरण संरक्षण गतिविधि तर्फे आपल्या सभोवतालच्या परिसरात किंवा डोंगरावर लावू.
५. गणपती ची आकर्षक मूर्ती, सजावट आणि विसर्जन या तीनही गोष्टी पर्यावरण पूरक निकषांवर तपासून त्यापासून विजेते घोषित केले जातील.
६. मूर्ती, सजावट यांचा फोटो व व्हिडिओ क्लिप खालील WhatsApp नंबर वर आपले नाव आणि registration नंबर आणि थोडक्यात आपले पर्यावरण पूरक निकष आणींसजवतीची संकल्पना विस्तृत या सह पाठवावे.
७. निवडक ठिकाणी परीक्षक पाहणीसाठी येतील.
संपर्क क्रमांक: +91 72639 36072

See also  यंदाचा राखीपौर्णिमा उत्सव समाजाचे रक्षण करणाऱ्या आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी : राजेंद्र धनकुडे