पुण्यातील गणेशोत्सवाला आज सुरूवात, घरोघरी मोठा उत्साह..

0

पुणे :

आज 31 ऑगस्टपासून पुढील 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला (Ganeshotsav) सुरुवात होत आहे. गणेशोत्सव 31 ऑगस्ट ते 09 सप्टेंबर या कालावधीत चालेल. गणपती बाप्पा पहिल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला घरोघरी विराजमान होतील.

पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. त्यामध्येही मानाच्या पाच गणपतींना विशेष स्थान आहे. यावर्षी कोरोनाचे निर्बंध नसल्याने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. पुण्यातील मानाचे पाच गणपतींची प्राणप्रतिष्ठा एकाच वेळी न होता वेगवेगळ्या वेळात केली जाणार आहे. गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांना बाप्पाचे दर्शन खुले होते. त्यामुळे कसबा ते केसरीवाडा या मानाच्या 5 गणपतींपाठोपाठ पुण्यात खास आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचेही दर्शन भाविकांना खुले होणार आहे.

 

See also  आरपीआय ला पुण्यात महापौर पद मिळाले पाहिजे : रामदास आठवले