पुणे मनपाची कॅग कडून चौकशी करा ! पुरावे आम्ही देवू – विजय कुंभार यांचे फडणवीसांना आव्हान!

0

पुणे :

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बृहन्मुंबई महानगरपालिकेची कॅग कडून चौकशी करून पालिकेतील भ्रष्टाचार उघड करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई प्रमाणे पुणे मनपाची ही कॅग मार्फत चौकशी करा , गैरव्यवहाराचे पुरावे आम्ही देवू असे आव्हान आपचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केले आहे.

पुणे मनपा वर भाजपची सत्ता होती. अनेक निविदा प्रक्रिया मध्ये घोटाळे झालेले आहेत. भरती आणि पदोन्नती मध्येही भ्रष्टाचार झालेला आहे. मनपा अधिनियमाचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात झले आहे व अनेक मार्गाने जनतेच्या पैशावर डल्ला मारला गेला आहे. या भ्रष्ट कारभारा मुळे स्मार्ट सिटी असलेल्या पुण्यात निकृष्ट दर्जाचे रस्ते व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. टँकर माफिया आणि मनपा प्रशासन यांच्या संगनमताने जनतेची लूट चालू आहे. या शिवाय अनेक गंभीर प्रकरणातील भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत.

See also  पुणे महापालिकेने वेताळ टेकडीवरील तीन विनाशकारी प्रकल्प रद्द करावे म्हणून पर्यावरण प्रेमींनी राबविले निषेध अभियान..