मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी

0

पुणे :

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक लोक बाहेर पडले आहेत. त्यामूळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळेच वाहतुकीवर ताण आला आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच संपूर्ण एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. वाहनांची वर्दळ जास्त असल्याने कोंडी झाली आहे.

खालापूरसह संपूर्ण एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याने एक्स्प्रेस वे जॅम झाला आहे. खंडाळा घाट ते आडोशी बोगदा असा सुमारे 4 ते 5 किलोमीटर पर्यंतच्या रांगा एक्सप्रेस हायवेवर लागल्या आहेत. एक्सप्रेस हायवेने प्रवास करणार्‍या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा काहीसा हिरमोड झाल्याचे चित्र आहे. बाहेर पडणाऱ्या नागरिकांचा वेळ वाहतूक कोंडी मधेच जात आहे.

See also  छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हरियाणातील पानीपतमध्ये स्थापन करण्यात येणार