प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध केली जाणार…

0

पुणे :

पुणे महापालिकेची प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी संदर्भातील कामकाज पूर्ण झाले आहे.

मतदार यादी संगणक प्रणालीत अपडेट केली जाणार आहे. त्यानंतर गुरुवारी (दि.21) प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी  प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी महापालिकेच्या www.pmc.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने 31 मे रोजी सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या प्रभाग निहाय मतदार याद्या तयार केल्या आहे. प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या 23 जून रोजी प्रसिद्ध करुन त्यावर 3 जुलै पर्यंत हरकती व सूचना कळवण्यास सांगितले होते. त्यानुसार प्राप्त झालेल्या हरकती व सूचना विचार घेऊन महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील तरतुदीनुसार प्रभाग निहाय अंतिम याद्या गुरुवारी (दि.21) प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय मतदार यादीच्या छापील प्रती पालिकेकडून सशुल्क क्षेत्रिय कार्यालयात उपलब्ध होणार आहेत.

क्षेत्रिय कार्यालयाचे नाव आणि त्यापुढे प्रभाग क्रमांक

1. औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय (Aundh-Baner Regional Office) – 11,12,13,14

2. भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय (Bhawani Peth Regional Office) – 27,28,39

3. बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय (Bibvewadi Regional Office) – 40,41,48,57,58

4. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय (Dhankawadi-Sahakar Nagar Regional Office) – 38,50,55,56

5. ढोलेपाटील रोड क्षेत्रिय कार्यालय (Dholepatil Road Regional Office) – 19,20,21

6. हडपसर-मुंढवा क्षेत्रिय कार्यालय (Hadapsar-Mundhwa Regional Office) – 22,23,24,25,45

7. कसबा-विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालय (Kasba-Vishrambagh Regional Office) – 17,18, 29,37

8. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय (Kondhwa-Yevalwadi Regional Office) – 46,47,49

9. कोथरूड-बावधन क्षेत्रिय कार्यालय (Kothrud-Bavdhan Regional Office) – 30-31,32,33

10. नगररोड-वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालय (Nagar Road-Vadgaon Sheri Regional Office) -3,4,5,6,7

11. शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय (Shivajinagar-Gholeroad Regional Office) – 10, 15,16

12. सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय (Sinhagad Road Regional Office) – 51,52,53,54

13. वानवडी-रामटेकडी क्षेत्रिय कार्यालय (Wanwadi-Ramtekdi Regional Office) – 26,42,43,44

See also  धक्कादायक : चादरी मध्ये गुंडाळून दिवसा मृतदेह फेकला !

14. वारजे-कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय (Warje-Karve Nagar Regional Office) -34,35,36

15. येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रिय कार्यालय (Yerwada-Kalas-Dhanori Regional Office)- 1,2,8,9