औंध येथे २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त होणार ‘विशेष योग शिबिर’

0

औंध :

२१ जून हा दिवस जगभरात ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळत, आज योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो. म्हणून माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या संकल्पनेतून आणि सोमेश्वर फाउंडेशन व इंदिरा गांधी मॉडेल स्कूल औंध यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी इंदिरा गांधीमॉडेल स्कूल औंध येथे ‘विशेष योग शिबिर’ आयोजित केले आहे.

या शिबिराची माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो. सद्यस्थितीमध्ये योगसाधनेला आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनवणे गरजेचे झाले आहे. याच उद्देशाने आम्ही २१ जून रोजी ‘विशेष योग शिबिर’ आयोजित करत आहोत. म्हणून औंध, बालेवाडी व सोमेश्वर वाडी परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिरात सहभागी व्हावे अशी विनंती आहे.

या शिबिरात योगप्रशिक्षक शिवाली महेंद्र बामगुडे या योगाभ्यासाबद्दल आपणास मार्गदर्शन करतील. आपण या निरोगी जीवनाची गुरकिल्ली असलेल्या योगसाधनेसाठी या शिबिरात २१ जून रोजी सकाळी ८ वा. सहभागी व्हाल, याची आम्हाला संपुर्ण खात्री आहे.

See also  सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सुपर सनी विक ( PABBS west festival) चे आयोजन...