भाजपाच्या तीन दमदार नगरसेवकांमुळे बाणेर बालेवाडी स्मार्ट : चित्रा वाघ

0

बाणेर :

माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष/कोथरूड मतदार संघांचे दानशूर दमदार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त स्मार्ट सिटी सोसायटी स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ आणि शहर संघटन/सरचिटणीस राजेश पांडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या प्रयत्नातून सर्वसामान्य नागरिकांना जेव्हा जेव्हा गरज पडेल मदत करण्याचे धोरण नेहमीच अवलंबिले आहे. कोरोना काळामध्ये गरजवंतांना व नागरिकांना येणाऱ्या अडचणींना सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून झटत आहे. स्मार्ट सोसायटीच्या स्पर्धेमध्ये परिसरातील ११८ सोसायट्यांनी उस्फुर्त सहभाग घेऊन आपली सोसायटी स्मार्ट कशी होईल त्यासाठी प्रयत्न करत स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत ज्या सोसायट्यांनी बक्षीस मिळवले त्यांचे अभिनंदन.आमचे मार्गदर्शक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी घालून दिलेल्या आदर्श अंगीकृत करून नागरिकांची सेवा करत आहे. दादांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, छत्री वाटप आणि गरजूं साठी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. मी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना नागरिक प्रचंड प्रतिसाद देऊन आमचा उत्साह वाढवतात.

या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी बोलताना भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की, स्मार्ट सिटी मधील स्मार्ट नगरसेवकांनी स्मार्ट होण्यासाठी आयोजित केलेल्या स्मार्ट स्पर्धा यशस्वी आयोजन केल्याबद्दल कळमकर कुटुंबीयांचे अभिनंदन. बाणेर बालेवाडी हा माझा सगळ्यात आवडता भाग आहे येथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर आणि नगरसेवक अमोल बालवडकर त्यांनी केलेल्या दमदार कामामुळे पुणे महानगर पालिकेत भाजपा नगरसेवकांनी केलेल्या जोरदार कामांची झलक मिळते. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत कार्यरत राहणारे आमचे कार्यकर्त, पदाधिकारी व नगरसेवक आहेत. स्पर्धेत सहभागी होवून बक्षिस मिळविनाऱ्या सोसायट्यांचे अभिनंदन यावेळी त्यांनी केले.

See also  डॉ. सागर बालवडकर यांच्या प्रयत्नातून बालेवाडी येथे लसीकरण केंद्र सुरू !

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वरांजली लतादीदीच्या लोकप्रिय मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम, बाणेर पाषाण टेकडीवर वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, छत्री वाटप अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे भागातील 118 सोसायटी ने सहभाग नोंदवला होता यामध्ये युतिका सोसायटी बाणेर यांनी प्रथम क्रमांक पटकवला त्यांना 51000/- रुपये रोख बक्षीस देण्यात आले,दुतीय क्रमांक बालेवाडी येथील कमफर्ड झोन सोसायटी ने मिळवला त्यांना 25000/-रुपये रोख बक्षीस देण्यात आले,
तृतीय क्रमांक डि एक के गंधकोष सोसायटी ने मिळवला त्यांना 15000/- रुपये रोख बक्षीस देण्यात आले
श्रीनाथ सोशल फाउंडेशन व नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या माध्यमातून हि रक्क्म देण्यात आली , मा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वसुंधरा स्वच्छता ग्रुपला झाडे लावण्यासाठी व झाडांचे संगोपन करण्यासाठी 25000/- रुपये रोख मदत देण्यात आली तसेच टॉप 11 वन, सोसायटी यांना प्रत्येकी 5000/-रुपये उत्तेजनार्थ देण्यात आले.
Top 11 (उत्तेजनार्थ) :
1. रेलिकोंन अल्फाइन रिज सोसायटी
2. वेलवर्थ पैराडाइज सोसायटी
3. बालाजी जेनेरेसिया सोसायटी
4. अष्टगंध सोसायटी
5. सुप्रिया संकुल सोसायटी
6. बेला कासा सोसायटी
7. ग्रीन झोन सोसायटी
8. रोहन लहर1 सोसायटी
9. फेलेसिटा सोसायटी
10. रोहन लहर 2 सोसायटी
11. अंजोर सोसायटी

यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस राजेश पांडे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, उमा गाडगीळ, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, सचिन मानवतकर, नारायण चांदेरे, शरद भोते, डॉ. राजेश देशपांडे आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सोसायटीतील पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.