“उत्कृष्ठ मनुष्यबळ ही साविञीबाई फुले पुणे विद्यापीठाची संपत्ती” : कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर

0

शिवाजीनगर :

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजीनगर, पुणे ७ यांच्यातर्फे बुधवार दि १८ मे २०२२ रोजी कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरवात प्रा. निकिता गायकवाड यांच्या ईशस्तवनानॆ झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना ज्योत्स्ना एकबोटे (सहकार्यवाह,प्रो. ए. सोसायटी) म्हणाल्या,”दोघांनीही खुप माणसं जोडली आणि खुप श्रीमंत होऊन तुम्ही जात आहात”

संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले,” समाजातील सर्व घटकांमधे यांनी बंधुत्वाचे नाते ठेवले आहे. कठीण परिस्थितीतुन अतिशय ऊत्कृष्ठ कामगिरी करून, अनेक प्रकारच्या कोंडीतून मार्ग काढून विद्यापीठाला अग्रकमावर नेऊन ठेवले आहे.”

मा प्रफुल्ल पवार कुलसचिव साविञिबाई फुले पुणे विद्यापीठ, ” NIRF च्या टाप १० मध्ये साविञिबाई फुले पुणे विद्यापीठ आहे याचे श्रेय कुलगुरूंना जाते.”

मा डॉ. एन एस उमराणी प्र.कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,”विद्यापीठाचा आत्मा संशोधन आहे. विद्यार्थ्यांना चारित्र्यवान व रोजगारक्षम घडवणे हे विद्यापीठाचे काम आहे.विद्यापीठाचे सगळे स्ञोत वापरून त्यांनी विद्यापीठाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल आहे.

सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. नितीन करमळकर (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) म्हणाले “विद्यापीठ हे बेट असता कामा नये. त्याचा समाजाशी सतत संबंध आला पाहिजे. समाजाशी संबंधित असा विद्यार्थी घडला पाहिजे. गुणवत्तेला कायम प्राधान्य राहिले पाहिजे.जास्तीत जास्त चांगल्या संकल्पना समाजापर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला.””उत्कृष्ठ मनुष्यबळ ही साविञीबाई फुले पुणे विद्यापीठाची संपत्ती आहे.” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा डॉ.निवेदिता एकबोटे, संस्थेच्या उपकार्यवाह यांनी केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन मा प्रा शामकांत देशमुख, कार्यवाह, प्रो ए सोसायटी यांनी केले.

कृतज्ञता सन्मान सोहळ्याला प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चे सर्व संबंधीततसेच सर्व विद्यालय महाविद्यायाचे प्राचार्य तसेच शिक्षक संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  खंडणीप्रकरणी नाना वाळके व अनिकेत हजारे यांना पोलिसांनी केली अटक