वाकड :
वाकड येथील किंग्स रॉयल रायडर्स शो रूम मध्ये बीएसएफ रायडर्स टीम सोबत होळी चा सण एन्जॉय करायची चांगली संधी शो रूम मधील सर्व स्टाफ ला मिळाली.
बीएसएफ ची रॅली काश्मीर ते कन्याकुमारी जात असताना आज त्यांनी डॉक्टर सागर बालवडकर यांच्या वाकड येथील बुलेटच्या शोरूम ला भेट दिली. त्यांनी शोरूम च्या स्टाफ सोबत होळी एन्जॉय केली. रंगा उधळण करत सोबत गाण्यांवर ताल धरत सुंदर डान्स देखिल त्यांनी केला.
यावेळी मिस्टर मुकेश डॉक्टर, रांशू रैना, इन्स्पेक्टर हिमांशू सिरोही, आणि बीएसएफचे रायडर्स डॉ. सागर बालवडकर आणि शोरूमचा स्टाफ उपस्थित होता. बीएसएफच्या रायडर्स मध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.