बावधन येथे महिला दिनानिमित्त गुरुस्वामी राधिकानंद यांचे प्रवचन उत्साहात पार.

0

बावधन :

महिला दिनाच्या निमित्त मानव संरक्षण समिती मार्फत कृष्णशांती रेसिडेन्सी बावधन बुद्रुक पुणे येथे बावधन गुरूस्वामी राधिकानंद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

गुरूस्वामी राधिकानंद यांनी श्रीमद्भगवदगीताचे अठरा अध्यायावर सोप्या ओघवती वाणीने प्रवचन दिल व सुरेल आवाजात स्वरचित अभंगात भजन करून सगळ्यांना मंत्र मुग्ध केल. या वेळी उपस्थित महिला प्रवचन आणि भजनात तृप्त झाल्या.

यावेळी लक्ष्मी देव, दुर्गा दगडे, सुजाता भुंडे, प्रियंका दगडे, निलिमा घुले, अर्चना घुले, साधना दगडे, सुजाता फडके, सारिका मोरे, सुरेख चिकणे, सुरेखा दगडे, सुनिता दगडे, बायडाबाई दगडे, रंजना चिकणे, अंजली कदम, आश्विनी देशमुख व जेष्ट महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी देव, दुर्गा दगडे, आणि सुजाता भुंडे यांनी विशेष प्रयत्न केले.

See also  "तू माझा सांगाती" या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा सरला चांदेरे यांच्या हस्ते संपन्न.