औंध, बाणेर, बालेवाडी प्रभाग रचनेमध्ये एकमेकांना जोडलेले गावांची ताटातूट…!

0

औंध :

आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या पुणे महानगरपालिका प्रभाग रचनेवरून औंध, बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे गावांमधील सर्वपक्षीय इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. बाणेर बालेवाडी ही गावे महानगरपालिकेमध्ये सामावेश झाल्यापासून या गावांचा डीपी देखील एकच आहे. नैसर्गिक रित्या ही गावे एकमेकास लागून आहेत. तसेच नव्याने समाविष्ट झालेले सुस व म्हाळुंगे ही गावे देखील बाणेर व बालेवाडी सीमेलगत आहेत. प्रभाग रचनेमध्ये एकमेकांना जोडलेले गावांची ताटातूट केली असल्याची चर्चा दिवसभर परिसरात सुरू होती.

परंतु जाहीर झालेल्या प्रभाग रचना मध्ये प्रभाग क्रमांक 12 औंध – बालेवाडी व प्रभाग क्रमांक 13 बाणेर- सुस म्हाळुंगे असा प्रभाग करण्यात आल्यामुळे औंध, बाणेर, बालेवाडी – सुस – म्हाळुंगे गावांमधील सर्वपक्षीय इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे. भारतीय जनता पक्षातील विद्यमान तीन नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांचे रहाण्याचे ठिकाण बालेवाडी – औंध प्रभागांमध्ये आले आहे. तसेच सर्वपक्षीय बहुसंख्य उमेदवारांचे रहाण्याचे ठिकाण बालेवाडी औंध प्रभागांमध्ये आल्यामुळे, बाणेर – सुस – म्हाळुंगे प्रभागासाठी प्रभागा बाहेरचेच बहुसंख्य उमेदवार निवडणूक लढवणार हे निश्चित.

नैसर्गिक रित्या बालेवाडी चा औंध गाव शी कोणत्याही पद्धतीने संबंध येत नाही. परंतु प्रभाग रचना मध्ये बालेवाडी व औंध ही दोन गावे जोडण्यात आली. तसेच बाणेर, सुस, म्हाळुंगे या गावांमध्ये पुणे महानगरपालिकेतील एकमेव दोन नगरसेवकांचा प्रभाग करण्याचा का घाट घातला हा प्रश्न सर्वांसाठी अनुत्तरीत आहे.

या सर्व प्रभाग रचनेमध्ये बाणेर परिसरातील राज्यात सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत.

 

 

 

 

 

See also  बालेवाडी येथील फर्स्ट एड पॉलिक्लिनिक ला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची भेट.