बालेवाडी :
बालेवाडी येथे लहू बालवडकर यांनी सुरू केलेल्या फर्स्ट एड पॉलिक्लिनिक ला केंद्रीय राज्यमंत्री (आरोग्य आणि कुटुंब कल्याण) डॉ. भारती पवार यांनी आज सदिच्छा भेट दिली. नागरिकांना अल्प दरात आरोग्य सेवा देण्याच्या हेतूने चालू केलेल्या या आरोग्य केंद्राबद्दल डॉ. भारती पवार यांना आधी पासूनच माहिती होती. त्यामुळे त्यांनी आवर्जून वेळ काढून फर्स्ट एड पॉलिक्लिनिक पाहण्यासाठी खास बालेवाडी येथे आल्या होत्या.
यावेळी लहु बालवडकर यांच्या या कामाचे कौतुक करताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले की, लहु बालवडकर यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता नागरिकांसाठी अल्पदरात उपलब्ध करून दिलेले पॉलिक्लिनिक एक आदर्श क्लिनिक आहे. त्यांनी आरोग्य क्षेत्रात असेच चांगले काम करावे. त्यांच्या या कामाबद्दलची माहिती अगोदरच समजल्याने या पॉलिक्लिनिकला भेट देण्याकरिता उत्सुक होते असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी त्यांनी लहू बालवडकर यांना पुढील राजकीय वाटचाली साठी व समाज सेवेसाठी शुभेच्छा देतानाच अशीच नागरिकांची आरोग्य सेवा करत राहावे अशी सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी लहू बालवडकर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी आवर्जून भेट दिल्याने आनंद व्यक्त केला. आपण केलेल्या सामाजिक उपक्रमाची दखल केंद्रातील मंत्री देखील घेत आहेत याचा विशेष आनंद वाटत आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची ऊर्जा निर्माण होते. डॉ. भारती पवार ह्या केंद्रामध्ये मंत्री असून देखील अतिशय साधेपणाने आणि काम करत असतात त्यांच्याकडे पाहून आम्हाला प्रेरणा मिळते. अशीच निरंतर सामाजिक सेवा करत राहू असे त्यांनी सांगितले.
यावेळी लहु बालवडकर सोशल वेलफेअर चे अध्यक्ष लहु बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, कोथरूड प्रभाग अध्यक्ष उमा गाडगीळ, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, उपाध्यक्षा नैना पोळ, आय.टी सेल च्या अध्यक्षा उज्वला साबळे, अस्मिता करंदीकर, रिना सोमय्या, राखी श्रीवास्तव, शिवानी अग्रवाल, सिमरन पुला, सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर, स्विकृत नगरसेवक शिवम सुतार, संतोष धनकुडे, किरण बालवडकर, शिवम बालवडकर, मच्छिंद्र बालवडकर, पप्पूशेट चांदेरे व इतर पदाधिकारी मित्र परिवार उपस्थित होते.