मंदार घुले यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

0

बावधन :

बावधन-पाषाण-सुतारवाडी परिसरातील नागरिकांना नूतन वर्षातील सण-वार, मुहूर्त, यात्रा-उत्सव आणि जयंती-पुण्यतिथी यासंदर्भातील इत्यंभूत माहिती सहज उपलब्ध व्हावी म्हणून भाजपा युवा नेते मंदार घुले यांनी तयार केलेल्या दिनदर्शिका 2022 चा प्रकाशन सोहळा आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांसाठी तिळगूळ वाटप करण्याचा शुभारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील तसेच पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

दिनदर्शिकेची माहिती देताना मंदार घुले म्हणाले की, आपल्या जीवनामध्ये दिनदर्शिकेला एक वेगळे महत्त्व आहे. दिनदर्शिका ही जीवनामध्ये अविभाज्य भाग असून आपल्या दिवसाची सुरुवात त्यापासून होते. सन – सनावळ, तिथी, वार आणि इतर सर्व उपयोगी माहिती या दिनदर्शिकेत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकापर्यंत ही दिनदर्शिका पोचविणार आहे.

या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, मंदार घुले यांनी आपल्या परिसरामध्ये सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. घरामध्ये आवश्यक असणाऱ्या दिनदर्शिका सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे चांगले काम मंदार करत आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना मंदार घुले यांचे कौतुक करताना म्हटले की, अतिशय नियोजन पूर्वक बनविलेली सुंदर दिनदर्शिका नागरिकांसाठी निश्चित उपयोगी पडणार आहे. अशी समाजोपयोगी कामे त्यांनी नेहमीच करत राहावी यासाठी त्यांना शुभेच्छा.

यावेळी भाजपा कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पुनित जोशी, नगरसेवक दिपक पोटे, संदिप खर्डेकर, नगरसेवक अजय मारणे, नवनाथ जाधव, दुष्यंत मोहोळ, वैभव मुरकुटे स्वीकृत नगरसेवक, बाळा टेमकर, सागर कडू, कैलास मोहोळ, रणजित हरपुडे, राजेश मनगिरे, मा. सरपंच अतुल धावडे, मा. सरपंच सुभाष नाणेकर, कल्पना महेश घुले ग्रामपंचायत सदस्य बावधन, निलिमा मंदार घुले, रोहित पडवळ, निखिल घुले, संजय धावडे, सुरज पडवळ, चेतन घुले, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

See also  नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने स्वखर्चाने टॅंकरने पाणीपुरवठा केला जाणार..!