नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने स्वखर्चाने टॅंकरने पाणीपुरवठा केला जाणार..!

0

म्हाळुंगे :

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे निमित्त नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यावतीने सुस आणि म्हाळुंगे गावांना दोन लक्ष लिटर मोफत पाणी पुरवठा दररोज २० टँकर ने करण्यात येणार आहे. या “मोफत पाणी पुरवठा संकल्प” या योजनेचा शुभारंभ म्हाळुंगे येथे करण्यात आला. या योजनेअंतर्गत म्हाळुंगे गावासाठी दररोज दहा टँकर पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. गावांमध्ये असणारे पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने महापालिकेतून आयोजन होईपर्यंत अमोल बालवडकर यांच्या वतीने स्वखर्चाने टॅंकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोलताना नगरसेवक अमोल बालवडकर यांचे कौतुक केले. अमोल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारातून सेवाभाव आहेच कर्तव्य याची जाण ठेवून गावातील महिलांना प्रामुख्याने भेडसावणाऱ्या पाणीप्रश्‍नासाठी दररोज दहा टँकर ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महिलांची होणारी ससेहोलपट काही प्रमाणात कमी होईल, हा एक चांगला उपक्रम आहे. गावातील इतर समस्या करिता ग्रामस्थांत सोबत चर्चा करण्याकरता लवकरच येणार आहे. गावातील समस्या सोडविण्यासाठी कसे नियोजन लावावे यावर विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, महापालिकेत समाविष्ट झालेल्या सुस म्हाळुंगे गावांना अनेक अडचणी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने महिलांना भेडसावणाऱ्या पाणी हा प्रश्न फार मोठा आहे. म्हणूनच गावातील नागरिकांसाठी सेवा हेच कर्तव्य जाणुन दररोज दहा टॅंकरने मोफत पाणीपुरवठा केला जाईल. तसेच महापालिकेत पाठपुरवठा करून २४ * ७ या समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनीतजी जोशी, म्हाळुंगे गावचे सरपंच मयूर भांडे, उपसरपंच बेबीताई पाडाळे, मा. सरपंच काळूराम गायकवाड, मा. सरपंच गिताताई गुजर, मा. उपसरपंच विवेक खैरे, मा. उपसरपंच पांडुरंग पाडाळे, मदनराव पाडाळे, अजिंक्य निकाळजे, मा. उपसरपंच स्मिता पाडाळे, मा. उपसरपंच युवराज कोळेकर, संदीपजी खर्डेकर, मा उपसरपंच उज्ज्वल पाडाळे, ग्रामपंचायत सदस्या बेबीताई खैरे मा. उपसरपंच राजेंद्र पाडाळे, सुनिल पाडाळे, लक्ष्मण पाडाळे, राहुल कोकाटे, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, प्रभाग अध्यक्षा उमा गाडगीळ, रिमा सोमय्या, किरण तापकिर, सदाशिव मोरे, मुळशी तालुका भाजपा चे युवा मोर्चा उपाध्यक्ष रंजित पाडाळे तसेच अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सर्व सभासद व मित्रमंडळ उपस्थित होते म्हाळुंगे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामस्थ, प्रभाग ९ चे सर्व भाजपा पदाधिकारी व सभासद यावेळेस उपस्थित होते.

See also  बाणेर नागरी पतसंस्थेतर्फे सिंधुताई सपकाळ यांचा सत्कार.