पाषाण येथील संत तुकाराम शाळेतील बंद असलेले लसीकरण सुरू करण्याची मागणी.

0

पुणे :

पाषाण येथील संत तुकाराम शाळेमध्ये लसीकरण केंद्र सुरू होते. परंतु शाळा सुरू झाल्याने संत तुकाराम शाळेमध्ये सुरू असणारे लसीकरण केंद्र बंद करावे लागले आहे. तसेच 15 ते 18 वयोगटातील तरुणांचे देखील लसीकरण सुरू झाल्याने परिसरात सद्या कै. सहदेव एकनाथ निम्हण हे एकमेव लसीकरण केंद्र असल्याने लसीकरण करून घेण्याकरता नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. म्हणूनच बंद झालेले हे लसीकरण केंद्र सुरू करण्या करीता भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस कृष्ण गंगा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन कोकाटे यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सदर लसीकरण केंद्र लवकरात लवकर चालू करावे, किंवा पर्यायी नवीन लसीकरण केंद्र सुरू करावे या साठी निवेदन दिले.

याबद्दलची माहिती देताना रोहन कोकाटे यांनी सांगितले की, सदर लसीकरण त्वरित सुरू करून किंवा पर्यायी नवीन लसीकरण केंद्र सुरू करून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी विनंती निवेदन देवून महापौरांना केली. महापौरांनी देखील यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर लसीकरण केंद्र कसे सुरू करता येईल यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.

See also  सचिन दळवी मित्र परिवाराकडून गोरगरिबांना फराळ वाटप.