९ व्या आंतरशालेय फुटबॉल व बास्केटबॉल “विद्यांचल ट्रॉफी” स्पर्धेला सुरुवात…

0

बाणेर :

बाणेर येथील विद्यांचल शाळेत ९ व्या आंतरशालेय फुटबॉल व बास्केटबॉल “विद्यांचल ट्रॉफी” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८ डिसेंबर २०२१ ते २३ डिसेंबर २०२१ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी वयोगटात १५ वर्षाखालील मुला-मुलींचा सहभाग आहे. या स्पर्धेत फुटबॉलचे ३२ संघ व बास्केट बॉलचे १२ संघ यांनी सहभाग घेतला आहे.

या स्पर्धेबद्दल माहिती देताना विद्यांचल हायस्कूलचे संस्थापक अशोक मुरकुटे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर खेळाची सुध्दा गोडी लागली पाहिजे. “विद्यांचल ट्रॉफी” स्पर्धेच्या निमित्त खेळाडूंच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठीचे काम निश्चित होणार आहे. अशी अपेक्षा व्यक्त करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे उदयजी महाले अध्यक्ष शिवाजीनगर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी व माजी राष्ट्रीय बास्केटबॉल क्रीडापटू खरडे पाटील उपस्थित होते. तसेच विद्यांचल हायस्कूलचे अशोक मुरकुटे, माजी नगरसेविका रंजनाताई मुरकुटे, भालचंद्र मुरकुटे, जयेश मुरकुटे, श्वेता मरकुटे, योगिता बहिरट, विद्यांचल शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा कुलकर्णी मॅडम, मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली महाजन, संगिता बुचडे व सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर वर्ग उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. त्यांनी आलेल्या सर्व संघाना त्यांच्या प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आवर्जून भेट दिली. खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

See also  द बिंग यू संस्था व लहू बालवडकर सोशल वेल्फेअर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेली मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार..!