ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावर अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

0

ओरिसा :

भारताने आज ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावर अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. अण्वस्त्र वाहून नेण्यासाठी सक्षम असलेल्या अग्नी मालिकेतील क्षेपणास्त्रांची हि प्रगत आवृत्ती आहे. जमिनीवरून जमिनिवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राचा पल्ला 1000 ते 2000 किमी आहे. या क्षेपणास्त्राची रचना आणि विकास संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने केली आहे.

अधिकाऱ्याने माहिती दिली कि चाचणी दरम्यान अग्नी प्राईम क्षेपणास्त्रात अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. याने सर्व मिशनचे लक्ष्य उच्च पातळीच्या अचूकतेने पूर्ण केले. अग्नी प्राईम हे अति आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले क्षेपणास्त्र अत्यंत कमी वजनाचे आहे.

या आठवड्यात भारताने ओडिशाच्या किनार पट्टीवरील कलाम बेटावरून सुपरसोनिक मिसाईल असिस्टेड टॉर्पेडो सिस्टीम यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. DRDO ने सांगितले कि हि प्रणाली पाणीबुडीविरोधी युद्ध क्षमता वाढवण्यासाठी तयार करण्यात आली आहे, जी पारंपारिक टॉर्पेडोच्या श्रेणीपेक्षा खूप जास्त आहे. डीआरडीओने एका निवेदनात म्हंटले की, “चाचणी योजनेनुसार झाली. या दरम्यान इलेक्ट्रो ऑप्टिक टेलीमेट्री सिस्टीम, डाउन रेंज इंस्ट्रुमेंटेशन आणि डाउन रेंज शिपसह विविध रडारद्वारे संपूर्ण प्रक्षेपणाचे निरीक्षण केले गेले.क्षेपणास्त्रामध्ये टॉर्पेडो , पॅराशूट वितरण प्रणाली होती.

अग्नी क्षेपणास्त्र आणि त्यांची श्रेणी

* SLV-3 बूस्टर यामध्ये वापरण्यात आले आहे, त्याची रेंज 700 किमी आहे. त्यात द्रव इंधन भरले जाते. त्याची पहिली चाचणी 28 मार्च 2010 रोजी झाली. हे क्षेपणास्त्र आण्विक साहित्य वाहून नेण्यास सक्षम आहे.
* अग्नी 2 : या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची रेंज ३००० किमी आहे. ते १००० कोलोपर्यंत साहित्य वाहून नेण्यास सक्षम आहे.
* अग्नी 3 : ‘अग्नी 3’ 3000 किमीपर्यंत जाऊ शकते. हे 600 ते 1800 किलोग्रॅमपर्यंतच्या अणु सामग्रीसह सुसज्ज असू शकते.
अग्नी 4 : हे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र आहे.

अग्नी 5 : अग्नी 5 ची पहिली चाचणी एप्रिल 2012 रोजी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राने भारतीय सैन्याला संपूर्ण चीनला लक्ष्य करता आले. त्याहची श्रेणी 5500 किमी आहे, जी 7000 किमीपर्यंत वाढवता येऊ शकते.

See also  माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू.

https://twitter.com/ANI/status/1472090528791482370?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1472090528791482370%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F