सुसगावातील शेल पेट्रोल पंपाचे उद्घाटन नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या हस्ते संपन्न

0

सुसगाव :

सुस गावात नव्याने सुरू होत असलेल्या शेल पेट्रोल पंपाचे उद्घाटन नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी अमोल बालवडकर यांनी सांगितले की, परिसरातील वाढती लोकसंख्या तसेच वाढती रहदारी पाहता निश्चितच या परिसरातील नागरीकांना या पेट्रोल पंपाचा मोठा फायदा होणार आहे. पेट्रोल पंप झाल्याने नागरिकांची वेळेची बचत होणार आहे. नागरीकांना सेवा पुरविताना पेट्रोल पंप व्यवस्थापनाने नागरिक समाधानी असेल असे काम करावे. चांगले व्यवस्थापन ठेवून नागरिकांची चांगली सेवा व्हावी म्हणून पेट्रोल पंप चालकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा !

यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, युवा नेते अनिलबाप्पु ससार, सरपंच अपुर्वा निकाळजे, अनंता चांदेरे, अतुल आमले, समिर पारखी, सलिम मोहमद, जय जव्हेरी, व मॅनेजर ज्योती कांबळे उपस्थित होत्या.

See also  ग्रंथालय आपल्या दारी या उपक्रमाची राष्ट्रवादीचे डॉ. सागर बालवडकर यांच्या वतीने सुरुवात.