ग्रंथालय आपल्या दारी या उपक्रमाची राष्ट्रवादीचे डॉ. सागर बालवडकर यांच्या वतीने सुरुवात.

0

बालेवाडी :

बाणेर-बालेवाडी, सुस, म्हाळुंगे भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर श्री खंडेराय प्रतिष्ठान (SKP) च्या विविध शिक्षणसंस्थामधील ग्रंथालयातील पुस्तके राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’ वाचनासाठी मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली गेली आहे.

याबद्दलची माहिती देताना डॉ. सागर बालवडकर यांनी सांगितले की, घरात वेळ जात नाहीये, कोरोना आणि इतर कारणांमुळे बाहेर पडता येत नाहीये. जवळपास चांगले ग्रंथालय नाहीये किंवा ग्रंथालयापर्यंत घेऊन जाणारे सोबत कोणी नाही. च्या अनेक समस्या ज्येष्ठ नागरिकांना भेडसावत असतात. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी व त्यांना चांगल्या प्रतीचे पुस्तके वाचन करण्याकरिता मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आव्हान करत आहे.

बाणेर-बालेवाडी मधील ज्येष्ठ नागरिकांना ही पुस्तके मोफत घरपोच पोहचवली जातील.
मोफत पुस्तके कशी मिळवाल ?

१) *Saagarsetu हे app* सोबत दिलेल्या लिंकवरून आपल्या फोनमध्ये डाउनलोड करा
२) दिलेल्या सूचीमधून पुस्तक निवडून घरपोच मागवा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.sics.saagarsetu

See also  बालेवाडीत महिलादिनानिमित्त   'रणरागिणी' या क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन