एमआयएम च्या एण्ट्रीमुळे नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत..

0

नांदेड :

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे रखडलेल्या जवळपास 14 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किमान सातवी पासची अट घातली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गावाखेड्यात आणि प्रत्येक पारावर गावपुढाऱ्यांची गणितांची जुळवाजुळव सुरु झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील 1014 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सध्या लगबग सुरु आहे. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात काँग्रेस, शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे प्राबल्य आहे. मात्र या चारही पारंपारिक राजकीय पक्षांना आता ग्रामपंचायत निवडणुकीत देखील एमआयएम आणि वंचित आघाडीने आव्हान दिलं आहे

नांदेडमधील एक ग्रामपंचायत सर्वाधिक चर्चेत आहे. नांदेड शहराजवळ मुस्लिम लोकसंख्या असलेल्या वाजेगावात ग्रामपंचायत निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी या गावची ओळख आहे. मात्र यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत एमआयएम पक्ष आपले पॅनल उभे करणार आहे. त्यामूळे रंगत आली आहे. साडे आठ हजार मतदार असलेल्या वाजेगावात 17 सदस्य निवडून द्यायचे आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम अशी ओळख या गावाची असल्याने इथली सत्ता मिळवण्यासाठी निकराची लढाई होणार असे दिसते.

निवडणुकीत नेहमीच एमआयएम आणि वंचित आघाडीचा काँग्रेसच्या मतविभागणी मध्ये मोठा वाटा असतो हे आज पर्यंत निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मतविभागणी झाली तर त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसू शकतो असे राजकीय निरीक्षक मत व्यक्त करत आहे.

See also  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती