कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली अन्न व अन्नपदार्थ तपासणी प्रयोगशाळा भाड्याने देण्यासाठीचा प्रस्ताव अखेर मंजूर

0

कोंढवा :

पुणे महापालिकेची कोंढवा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली अन्न व अन्नपदार्थ तपासणी प्रयोगशाळा भाड्याने देण्यासाठीचा प्रस्ताव २६ महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता.

मात्र मंजुरी अभावी कोट्यवधींची यंत्रणा धूळखात पडून पालिकेचे ६५ लाखांचे नुकसान झाले. अखेर आज महापलीकेने हा प्रस्ताव मंजूर केला आहे.

पुणे महापालिकेने २०११ मध्ये कोंढवा येथे काही कोटी रुपये खर्च करून एक प्रयोगशाळा उभारली असून, तेथे अन्न व अन्नपदार्थांची तपासणी करण्याचे काम ही प्रयोगशाळा करते. २०१४मध्ये सात कोटी ७० लाख रुपयांची अत्याधुनिक उपकरणेहीतेथे घेण्यात आली. २०१३मध्ये ही प्रयोगशाळा महापालिकेला चालविणे शक्य नाही, या नावाखाली ती चालविण्याकरिता ‘फुडी हायजेनी अॅण्ड हेल्थ लॅब’ या संस्थेशी पाच वर्षांचा करारनामा करण्यात आला.
या पाच वर्षांच्या करारादरम्यान पुणे पालिकेने प्रयोगशाळा चालविण्यापोटी या संस्थेस करारनाम्याप्रमाणे तीन कोटी ५६ लाख रुपये दिले. याशिवाय या ठिकाणचे वीज बिल, तसेच प्रयोगशाळेसाठी लागणारी केमिकल्स व इतर गोष्टी यापोटी पालिकेनेकिमान ६० लाख रुपये खर्च केले. पालिकेला प्रत्यक्षात पाच वर्षांत मिळून १२.७८ लाख रुपये उत्पन्न मिळाले.

तीन वर्षांपूर्वी प्रयोगशाळा भाड्याने देऊन वर्षाला ३० लाख रुपये उत्पन्न महापालिकेला मिळवून देणारा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सप्टेंबर २०१९ मध्ये मंजूर करून करण्यात आला. मात्र, पालिकेला उत्पन्न मिळवून देणारा हा प्रस्ताव अद्यापि सर्वसाधारण सभेच्या संमतीसाठी प्रलंबित राहिला होता ज्यामुळे महापालिकेचे २६ महिन्यांत ६५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले.

अखेर महापालिकेच्या‌ मुख्यसभेने सोमवारी या प्रस्तावास मंजुरी दिली. या मंजुरीनुसार शिंदे असोशिएट ऑन्ड मल्टिसर्व्हिसेस या ठेकेदार संस्थेला १० वर्षासाठी प्रयोगशाळा चालवण्यास भाडेतत्वावर देण्यात‌ येणार आहे.

See also  रिक्षा चालकाच्या मुलीला मिळाली 2 कोटींची स्काॅलरशिप