१० वी१२ वीच्या गुणवंतांना पुणे महापालिके कडून ५१ हजार रुपये देण्यात येणार

0
slider_4552

 

पणे:

पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमिक शाळांतील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुक्रमे ८५ टक्के आणि ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणार्या गुणवंत विद्यार्थ्यांना शारदाबाई पवार योजनेअंतर्गत प्रत्येकी ५१ हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या वर्षी इयत्ता दहावीच्या १५८ आणि इयत्ता बारावीच्या ३०३ अशा एकूण ४६१ विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रत्येकी ५१ हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी २ कोटी ३५ लाख ११ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात एक कोटी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

उर्वरित एक कोटी रुपयांचे वर्गीकरण पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएमएल मोफत बससेवेच्या तरतुदीतून करण्यात आले आहे. या वर्षी पहिल्या सत्रात शाळा सुरू नसल्याने एकूण सात कोटी रुपयांपैकी बहुतांश तरतूद शिल्लक असल्याने त्यापैकी एक कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.’

See also  इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाचे आंदोलन.