भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी राहूल द्रविड

0

मुंबई :

टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात बरेच बदल होणार आहेत. कर्णधार कोहली टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असून संघाला एक नवा प्रशिक्षकही मिळणार आहे. बीसीसीआयने बऱ्याच काळापासून मुख्य प्रशिक्षकासह, बोलिंग कोच आणि फिल्डिंग कोच पदासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी रवी शास्त्रीनंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती. पण द्रविडने यामध्ये रस दाखवला नव्हता. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार द्रविडची या पदासाठी नियुक्ती झाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

द्रविडने काही दिवसांपूर्वी श्रीलंका दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं होतं. त्यावेळी भारताने विजयही मिळवला होता. तेव्हापासून द्रविडला मुख्य संघाचा हे़ड कोच करण्यात यावं अशा मागणीने जोर धरला होता. पण राहुल द्रविड हा नॅशनल क्रिकेट अॅकेडमीचा (National Cricket Academy) प्रमुख या पदावर असल्याने तो ही संधी घेत नव्हता. त्याला ज्यूनियर स्तरावरील खेळाडूंच्या निवडीसाठी आणि त्यांचा खेळ सुधारण्यासाठी काम करायचं असल्याने तो या पदावर होता. पण काही दिवसांपूर्वीच राहुलने मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज दिला होता. आता त्याची याजाही नियुक्तीही झाली आहे. त्यामुळे नॅशनल क्रिकेट अॅकेडमीचा प्रमुख म्हणून व्हिव्हिएस लक्ष्मण (VVS Laxman) याची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

गांगुलीसह जय शाहंच्या राहुलला शुभेच्छा

द्रविडची नियुक्ती हेड कोच म्हणून होताच त्याला अनेकांनी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. यावेळी बीसीसीआय अध्यक्ष आणि राहुलचा माजी सहकारी सौरव गांगुलीने राहुलच्या नियुक्तीवर आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला, ‘राहुल एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने अनेक वर्ष अप्रतिम खेळ दाखवला असून नॅशनल क्रिकेट ॲकेडमीचा प्रमुख म्हणूनही त्याने काम पाहिलं आहे. आता हेड कोच होऊन तो संघाला आणखी मोठ्या यशाच्या शिखरांवर नेईल अशा मला आशा आहे.’

तर शाह यांनी राहुलला शुभेच्छा देताना म्हणाले,’भारतीय संघाचा मुख्य कोच म्हणून राहुल पेक्षा कोणताच चांगला पर्याय आमच्यासमोर नव्हता. पुढील काही काळातच टी20 आणि 50 षटकांचे असे दोन विश्वचषक असल्याने या महत्त्वाच्या स्पर्धांपूर्वी राहुलसारखा योग्य व्यक्ती मुख्य कोच संघाला मिळाला आहे. मला आशा आहे तिन्ही प्रकारात भारत अप्रतिम कामगिरी करेल.’

See also  सलग तिसऱ्यांदा इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी दरम्यान जार्वो  नावाच्या व्यक्तीची मैदानात घुसखोरी