शिवसंग्राम पक्षाने घेतला पुणे महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय

0

पुणे:

आगामी महानगरपालिका निवडणूकित महाविकास आघाडी एकत्र लढणार ,कुठले पक्ष निवडणूक लढवणार याची चर्चा चालू आहे. आज शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली त्या बैठकित शिवसंग्राम पक्षाने पुणे महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला शिवसंग्राम पक्षाचे तानाजी शिंदे,तुषार काकडे प्रदेश प्रवक्ता,शिवसंग्राम,शहर अध्यक्ष भरत लगड, बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते. विनायक मेटे यांनी आज विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

विनायक मेटे म्हणाले,बीड जिल्ह्यात दहा महिन्यात 160 शेतकऱ्यांनी आत्महत्या शासकीय आकडेवारी नुसार झाल्या आहेत.मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचे साधे पंचनामे देखील अजून झाले नाहीत.सरकारला शेतकरी,गोरगरीबांचे काही घेणं देणं काही नाही .दिवाळीत जर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही दिवाळी झाल्यानंतर शिवसंग्राम मोर्चा काढणार असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण कमी होतं . असेही विनायक मेटे म्हणाले.

मराठा आरक्षणावर पण त्यानी भाष्य केले .मराठा आरक्षण मिळाव म्हणून सरकार कोणतीही हालचाल करत नाही .ओबीसींची जनगणना करायला मागासवर्गीय आयोगाला 450 कोटी हवे होते . राज्यसरकार मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही हे ठाकरे सरकारचं धोरण आहे.शरद पवार हे मराठा आरक्षण सोडून सगळ्या प्रश्नांवर बोलतात. अशी टीका विनायक मेटे यांनी शरद पवार यांच्यावर केली. आर्यन प्रकरणावर पण त्यांनी भाष्य केले. ठाकरे सरकारला आर्यन प्रकरण फक्त दिसत आहे. राज्यातील विविध प्रश्न ठाकरे सरकारला दिसत नाही. असा खाना घाट विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर केला.

See also   चंद्रकांत पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न, करमणूक कर लावायची गरज : रूपाली चाकणकर