पाषाण रोड वरील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमी नागरिकांचा विरोध…!

0

पाषाण:

पुणे विद्यापीठ ते पाषाण रस्त्यावर मोठे वृक्ष फुटपाथ व सायकल ट्रॅकला अडथळा म्हणून तोडण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. वृक्षतोड करून राबविण्यात येत असलेले पर्यावरणपूरक उपक्रम हे नक्की कोणत्या विकासासाठी असा प्रश्न पर्यावरण प्रेमी नागरिकांनी उपस्थित करत, या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी रोष व्यक्त करत संबंधित ठिकाणी येऊन निदर्शने केली.

याठिकाणी सुमारे 25 वर्ष जुनी असलेली झाडे या सायकल ट्रॅकसाठी तोडण्यात येणार आहेत. तर काही झाडे तोडण्यात आले असून सायकल ट्रॅकसाठी झाडे तोडण्यात येऊ नयेत अशी मागणी या परिसरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे. यापूर्वीही पालिकेने तयार केलेले सायकल ट्रॅक वापरात नाहीत. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत ठेवण्यात आलेल्या सायकली देखील सध्या पाहायला मिळत नाहीत. असे असताना सायकल ट्रॅकसाठी सुमारे पन्नास वर्षांपासून अधिक जुनी असलेली झाडे तोडून पालिका पर्यावरणाचे नुकसान करीत आहे. पालिकेच्या या कायदेशीर वृक्षतोडीचा पर्यावरणप्रेमी नागरिकांनी विरोध दर्शवत निषेध व्यक्त केला.

वसुंधरा स्वच्छता अभियानचे दीपक श्रोते म्हणाले, नागरिक म्हणून आम्हाला नकोय असा उजाड करणारा विकास. या आधी मनपाचे वृक्ष पुनर्ररोपनात झाडे जगत नाही हा अनुभव आहेच. सायकल ट्रॅक व पदपथाचे काम झाडे न तोडत ही होऊ शकतात. यामुळे वृक्षतोड करण्यात येऊ नये. यावेळी रवी सिन्हा, राजेश चौरे, पुष्कर कुलकर्णी, कीर्ती काळे, समीर उत्तरकर, संतोष पाषाणकर आदी उपस्थित होते.

See also  सराफ व्यावसायिक मिलिंद मराठे यांचे निधन.