१४ वर्षाच्या मुलीचा कोयत्याने वार करत निर्घुण खून !

0
slider_4552

बिबवेवाडी :

पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे पुणे हादरले आहे पुण्यातील बिबवेवाडी परिसरामध्ये कबड्डी पट्टू असलेल्या आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे.

या घटनेबद्दल पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी सायंकाळच्या सुमारास कबड्डीच्या सरावासाठी आली होती. तेव्हा हृषिकेश हा त्याच्या मित्रा सोबत दुचाकीवरून तिथे आला आणि काही समजण्याच्या आत त्याने कोयत्याने आणि चाकूने तिच्यावर वार केले. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्या मुलीच्या मैत्रिणींना धमकावून पळून लावले आणि तो देखील घटनास्थळावरून पसार झाला.

क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14, रा. बिबवेवाडी) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. तर ऋषिकेश उर्फ शुभम बाजीराव भागवत (वय 21, रा. लोहम, खंडाळा, जि. सातारा), त्याचे दोन साथीदार व अन्य दोघे अशा पाच जणांविरुद्ध अशा तिघांविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यानंतर जखमी अवस्थेतील त्या मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केले असावे, असा अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच या घटनास्थळी आम्हाला पिस्तूल देखील आढळून आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

See also  ४६ देशांमध्ये सायकल वर जाऊन नितिन सोनावणे यांनी गांधी विचारांचा प्रचार व प्रसार केला : डॉ. कुमार सप्तर्षी