बाणेर विजय सेल्स मधील कंत्राटी कामगारांवर होणारा अन्याय थांबवावा : मनसेची मागणी

0

बाणेर :

बाणेर येथील विजय सेल्स मध्ये करण मेंटेनन्स प्रायव्हेट लिमिटेड च्या अंतर्गत कंत्राटी कामगार म्हणून कामावरती असणारे बरेच कामगारांना पीएफ दिला जात नाही. त्यांची पिळवणूक होत आहे. त्याच्याविरोधात बाणेर चे मनसेचे कोथरुड उपविभाग अध्यक्ष अनिकेत मुरकुटे, माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझीरे त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी नुसार, आज विजय सेल्स मध्ये जाऊन होणाऱ्या अन्यायाबाबत जाब विचारण्यात आला. तसेच विजय सेल्स व्यवस्थापनास कंत्राटी कामगारांवर ती होणारा अन्याय थांबणे बाबत निवेदन देण्यात आले.

तिथे कामावर असणाऱ्या असंघटीत कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही. कोणत्याही कामगारांना पिएफ नंबर दिला गेला नसून पीएफ नंबर विचारल्यास मुंबईला जाऊन ऑफिस मध्ये भेट घ्यावी असे सांगितले जाते. तसेच कामाहून काढण्याच्या धमक्या दिल्या जातात. त्यातील कामगारांनी सदर अन्याया बाबत मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्याची दखल घेत मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहरअध्यक्ष निलेश माझिरे यांनी सांगितले की, गोरगरीब कामगारांवर होणारा अन्याय मनसे सहन करणार नाही. संबंधित कामगारांचा पीएफ ताबडतोब जमा केला जावा. तसेच त्यांचे पगारात होणारी बेकायदेशीर कपात त्वरित कामगारांना अदा करावी. विजय सेल्स च्या व्यवस्थापनाने संबंधित कंत्राटदार वरती कारवाई करावी. अन्यथा मनसे अन्याय सहन करणार नाही. आक्रमकपणे आंदोलन करेल.

यावेळी मॅकन्यूज ला माहिती देताना अनिकेत मुरकुटे यांनी सांगितले की, बीड, लातूर, परभणी भागातील अत्यंत गरीब व गरजू लोकांना येथे कामावर ठेवून त्यांची पिळवणूक केली जाते. त्यांच्या मासीक पगार मधून अनियंत्रितपणे कपात केली जाते. गोर गरीब कामगार निमूट पणे हा अन्याय सहन करत होता. परंतु मनसेकडे आलेले हे कामगार इथून पुढे अन्याय सहन करणार नाही. व त्यांच्या वरती कोणत्याही प्रकारचा अन्याय मनसेच्यावतीने होऊन देणार नाही. प्रसंगी वेळ पडल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा विजय सेल्स व्यवस्थापनाला देण्यात आला.

See also  सुस म्हाळुंगे गावांना मुबलक पिण्याचे पाणी मिळावे : महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन बाबुराव चांदेरे यांनी केली मागणी. 

सदर आंदोलनाची दखल घेत विजय सेल्स याच्या सिनियर HR आधिकारी अभिषेक नांदगिरी तसेच सेल्स मॅनेजर भुनेश्वर गुरूंग यांनी सांगितले की कंत्राटदार कामगारांची पिळवणूक करत आहे. ही बाब निदर्शनास आली असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. कामगारांचा पीएफ संदर्भात सर्व माहिती संबंधित कंत्राटदाराकडून घेतली जाईल.