महाराष्ट्र बंदला पाषाण मध्ये उत्तम प्रतिसाद तर बाणेर बालेवाडी संमिश्र प्रतिसाद.

0

पाषाण :

लखीमपुर खीरी येथे अंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून आठ जणांना मृत्यूमुखी पाडण्यात आले. त्या केंद्रीय गृह राज्यमंत्री पुत्राला पाठिशी घालणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाषाणयेथिल व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळून पाठिंबा दर्शवला.

पाषाण मुख्य बाजारपेठ, सुतारवाडी, सुस रोड परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बाणेर बालेवाडी परिसरात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसले. बरेच दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. काही अंशी दुकानदारांनी दुकाने चालू ठेवली होती. सदर बंद दरम्यान औषधे व किराणा मालाची दुकाने तसेच खाद्य विक्रीची दुकाने उघडे ठेवण्यात येणार असल्याने ही दुकाने उघडी होती.

या बंद संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीच्या वतीने जो बंद पाळला गेला, त्यास सर्वच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत बंद शांततेने पार पाडला. कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद यशस्वी झाला. यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचेच महाविकास आघाडीच्या वतीने आभार मानत आहोत.

शिवसेनेचे संतोष तोंडे यांनी सांगितले की, पाषाण परिसरामध्ये व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र बंदला सहकार्य करावे असे आव्हान केले होते. त्यानुसार सर्वच व्यापाऱ्यांनी सहकार्य करून बंद यशस्वी करण्याकरिता उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली.

बाणेर-बालेवाडीमध्ये नगरसेवक बाबुराव चांदेरे, शिवसेना उपशहरप्रमुख राजेंद्र धनकुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर, डॉ. दिलीप मुरकुटे, नितीन कळमकर, विशाल विधाते, समीर चांदेरे, काँग्रेस चे जीवन चाकणकर आदि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंद यशस्वी पार पाडण्यासाठी आवाहन केले होते. यावेळी शेतकरी कायदेविरोधात व शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी, व्यापारी संघटना सामाजिक संघटना यांनी बंद मध्ये सहभाग घेतला.

See also  खासदार संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त महाळुंगे येथे डॉक्टर दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन..