सचिन पाषाणकर यांच्या सहकार्याने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना मोफत लसीकरण…!

0

पाषाण :

दत्तमंदिर पाषाण सुसरोड या ठिकाणी बाळासाहेब देवरस पाॅलिक्लिनिक, लोकविकास संस्था, शाश्वत हाॅस्पिटल आणि सहयोगी संस्थाच्या सहकार्याने सह्याद्री फाऊंडेशन पाषाण यांनी अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण अभियान राबविले होते. कार्यक्रमाचे आयोजन सह्याद्री फाऊंडेशन यांनी स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर यांच्या सहकार्याने केले होते.

अभियानाची सुरवात दत्तगुरू आणि भारत मातेच्या पुजनाने संतसेवक ह.भ.प.मारुतीमहाराज कोकाटे,पाषाण बाणेर लिंक रोड समितीचे अध्यक्ष राजेंद्रजी चित्तूर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाषाण नगराचे संघचालक राजाभाऊ सुतार यांच्याहस्ते झाली.

याची माहिती देताना सचिन यांनी सांगितले की,
कोरोना संकट अजूनही पुर्ण पणे दूर झालेले नाही. त्यामुळे लासिकरण करून घेणे फार महत्वाचे आहे. परंतू अल्प उत्पन्न धारक नागरिकांना लसीकरण करून घेणे शक्य होत नाही. म्हणून बाळासाहेब देवरस पाॅलिक्लिनिक, लोकविकास संस्था, शाश्वत हाॅस्पिटल आणि सहयोगी संस्थाच्या सहकार्याने सह्याद्री फाऊंडेशन यांच्या माध्यमातुन अल्प उत्पन्न धारक नागरिकांना लसीकरण मोहीम राबवली आहे. रविवार दि.10/10/2021 रोजी देखील लसीकरण अभियान पंचशिल बौद्धविहार स.न.1 पाषाण या ठिकाणी होईल अल्प उत्पन्न धारक नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आव्हान त्यांनी केले.

यावेळी भाजपा उपाध्यक्ष राहुल कोकाटे, उत्तम जाधव, प्रविण आमले, रोहन कोकाटे, नवनाथ ववले, सुहास पाषाणकर, शरद पाषाणकर, विजय सुपेकर, अशोक पाषाणकर, योगेश पाषाणकर, अभिजीत पाषाणकर, प्रदिप खोडं,सचिन ववले,विकास पाटील, शरद कोकाटे, केशव कोकाटे, राजेंद्र पाषाणकर, मनोज पाषाणकर, नेताजी कोकाटे, संदेश पाषाणकर, सतिश पाषाणकर, रत्नाकर मानकर, गिरीश कर्णिक, नरेंद्र कलकर्णी, मदन पाषाणकर, सुनील भाले, प्रकाश पाषाणकर, महेंद्र रणपिसे, रोहिदास कोकाटे, सुमीत सुतार, आकाश पवार, आदित्य पाषाणकर, श्रीकांत लोंढे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  बाणेर-पाषाण टेकडीच्या पायथ्याशी बेकायदेशीररित्या राडारोडा टाकून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी.