पुणे :
अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय प्रभारी अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे यांची केंद्रीय कार्यकारणी सर्वसाधारण सभेमध्ये 3 ऑक्टोंबर 2021 रोजी वर्णी लागली. त्यानिमित्ताने प्रहार जनशक्ती पक्षाने मोफत आरोग्यदायी शिबिर व औषधे वाटप आयोजित केले होते. अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर व जिल्हा कार्यकारिणीतील नवनिर्वाचित पदावर नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी उपस्थित पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र कोंढरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा मार्गदर्शक नंदकिशोर जगदाळे आणि पुणे जिल्हा कामगार आघाडी सल्लागार प्रेमजी पटेल, किशोर मोरे, नितीन सोनवणे अध्यक्ष कॅन्टोन्मेंट मतदार संघ, मेहबूब भाई शेख कार्याध्यक्ष कॅन्टोन्मेंट मतदार संघ, रोहित भोसले कार्याध्यक्ष पुणे शहर, सुनील गोरे पुणे शहर अध्यक्ष, मीनाताई धोत्रे महिला शहर अद्यक्ष, सायलिताई शिंदे उप अध्यक्ष महिला आघाडी, संदीप जाधव अध्यक्ष भोसरी विधानसभा, महेश कणकुरे हवेली तालुका अध्यक्ष, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष किशोर जोशी, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष शशिकांत उपादये, मुकेश धोबी, ऋषीराज मालवणकर, आनंद पाटील, अजिंक्य तेलंग, व इतर पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते तसेच आरोग्य शिबिरात गोरगरीब व सर्वसाधारण समाजातील लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे. सूत्र संचालन पुणे जिल्हा संघटक नीरज कडू यांनी केले.