शिवनगर येथील नवरात्री उत्सवाला सुरवात..

0

सुतारवाडी :

अखेर या वर्षी कोरोनाचे सावट काहीसे दूर सारत नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. राज्य सरकारने घालून दिलेल्यानियमांचे काटेकोर पणे पालन करत सुतारवाडी येथील शिवनगर सार्वजनिक नवरात्रौत्सव वास सुरुवात झाली आहे. गुरुवारी देवी मातेची आरती शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि मंडळाचे अध्यक्ष संतोष तोंडे यांच्या हस्ते झाली.

यावेळी बोलताना संतोष तोंडे यांनी सांगितले की, गेली दोन वर्ष कोणाच्या संकटामुळे कोणते सण साजरे करता आले नाही. परंतु यावेळी कोरोना चे प्रमाण कमी झाल्यामुळे बरेच निर्बंध उठवून मंदिरे देखील उघडलेली आहेत. सर्वसामान्यांच्या भक्तीचा सागर नवरात्र उत्सवात फुलून उठतो. सगळीकडे भक्तिमय वातावरण असते. बऱ्याच कालावधीनंतर आनंदमयी वातावरणात देवीचा उत्सव साजरा करता येणार आहे. मंडळाचे सर्व कार्यकर्ते नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून नवरात्र उत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करेल असे त्यांनी सांगितले.

नवरात्री उत्सव मध्ये महिला मोठया प्रमाणात आनंदात भक्ती भावाने सहभागी होतात. शिवनगर येथे देवी मातेची आरती प्रसंगी मोठया प्रमाणात महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

See also  दर्शन पार्क सोसायटीतील अंतर्गत रस्ता पुर्ण