अयोध्येतील प्रभू रामचंद्रांचं मंदिर 2023 मध्ये भक्ताांसाठी सुरू होणार

0

आयोद्या :

अयोध्येतील प्रभू रामचंद्रांचं मंदिर 2023 मध्ये भक्ताांसाठी सुरू होणार आहे. त्यामुळे प्रभू रामाचे भक्त या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकणार आहेत. डिसेंबर 2023 मध्ये हे मंदिर सुरू होणार आहे. 5 ऑगस्ट 2020 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती. तेव्हापासून मंदिराचं बांधकाम सुरू करण्यात आलं आहे. मंदिराच्या बांधकामासाठी श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून देणग्या गोळा करण्यात आल्या आहेत. श्रीराम मंदिर निर्माण समिती यासाठी बांधकाम करते आहे.

गेल्या अनेक दशकांपासून राम मंदिर हा राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांचं राष्ट्रीय राजकारण हे राम मंदिराभोवती फिरतं आहे. अशाच विविध चर्चांनी वेढलेलं हे राम मंदिर आता पूर्ण होऊन 2023 च्या डिसेंबर महिन्यापासून भक्तांसाठी खुलं होतं आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अयोध्येतील संपूर्ण मंदिराचा परिसर हा 2025 पर्यंत पूर्ण होईल अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. म्युझिअम डिजिटल अर्काइव्ह आणि रिसर्च सेंटर या सगळ्याचा मंदिर परिसरामध्ये समावेश असणार आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राम मंदिराचा मुद्दा समोर आणणार यात काहीही शंका नाही. भाजपचं राजकारण बरचंसं या प्रश्नाभोवती फिरताना दिसलं आहे. राम मंदिराच्या गाभाऱ्याचं काम 2023 पर्यंत पूर्ण व्हावं यासाठी सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. पूर्ण बांधकाम व्हायच्या आधीच रामलल्ला, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती स्थापन करण्याचा भाजपचा मानस आहे असंही समजतं आहे. त्यानंतर उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये होणार आहे. त्या निवडणुकीच्या सहा महिने आधी श्रीराम मंदिर सुरू करण्याच्या तयारीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर वहीं बनाएंगेचा नारा भाजपने दिला आहे. तो नारा आता वास्तवात आणून 2024 ची निवडणूक पार पाडणार आहे. संपूर्ण मंदिरांचं बांधकाम 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

See also  पुण्यातील मुळा-मुठा नदीच्या पुनरूज्जीवना संदर्भात दिल्लीत आढावा बैठक घेतली.